माजी मंत्री एकनाथ खडसेंची नऊ तास ईडी कार्यालयात चौकशी

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse)चौकशीसाठी यांची सकाळी अकरा वाजल्यापासून नऊ तास सक्त वसुली संचलनालय ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर खडसे त्यांच्या कन्या रोहिणी यांच्यासह रवाना झाले मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

आवश्यक असेल त्यावेळी पुन्हा हजेरी

Re-appearance when necessary

खडसे यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी माध्यमांना सांगितले की, खडसे यानी चौकशीला संपूर्ण सहकार्य केले असून ज्या ज्या वेळी आवश्यक असेल त्यावेळी पुन्हा हजर होण्याचे मान्य केले आहे. त्यांच्याकडे उपलब्ध सर्व कागदपत्रे त्यांनी सादर केली असून आणखी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मागून घेण्यात आल आहे.

कोणताही गैर व्यवहार केलेला नाही

No misbehaviour has been done

खडसे यांच्या वकीलांनी सांगितले की, भोसरी भुखंड प्रकरणात खडसे यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे दिली असून याबाबतच्या व्यवहारात कोणताही गैर व्यवहार केलेला नाही असे खडसे यांच्याकडून सांगण्यात आल्याचे त्यांच्या वकीलांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसें यांनी माध्यमांशी संवाद साधताना ’माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप केला होता.

नाथाभाऊंना छळण्यासाठीच हे षडयंत्र

This conspiracy is only to torture Nathabhau

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजप सोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर या चौकश्या सुरू झाल्या. ही कारवाई केवळ राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे, असे सांगत ते म्हणाले की, ‘जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असा निर्धार खडसे यांनी व्यक्त केला.

पाच वेळा चौकशी, अजून किती करणार
Five times the inquiry, how much more will you do

खडसे म्हणाले की, ‘ती जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलाच नाही. त्याचा मोबदला दिला नाही. ताबाही दिला नाही. आम्ही जमिन खरेदीचा सर्व खासगी व्यवहार केला आहे. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचे नाव होते. हे वारंवार सांगितले आहे. पाच वेळा याबाबत चौकशी झाली. लाचलुचपत विभागानेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल त्यांनी केला होता.


प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या उपस्थितीत माथाडी कामगारांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. –

काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल !: नाना पटोले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही सहभाग : ईडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही सहभाग : ईडी

Social Media