वायुसेनेचे हेलिकॉप्टर नागपुरातील फुटाळा तलाव परिसरात स्थापन…

नागपूर : आपल्या तिन्ही सशस्त्र दलाबद्दल जनतेला आपुलकी , अभिमान वाटावा यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या सेवेतील एमआय-8 ताफ्यातील वायुसेनेचे सेवा संपलेले एक हेलिकॉप्टर नागपुरातील फुटाळा तलाव येथे स्थापन करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Union Minister Nitin Gadkari) यांच्या प्रयत्नांतून नागपूरच्या फुटाळा तलाव परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत असून या सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत सार्वजनिक प्रदर्शनाचा भाग म्हणून वायुदलाचे प्रताप हे हेलिकॉप्टर नागरिकांना आता जवळून बघता येणार आहे. या हेलिकॉप्टर ने तब्बल 45 वर्षे वायुसेनेत आपली VVIP करिता आपली सेवा दिली आहे.

विशेष म्हणजे नागपुर चे महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नुकतेच केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे वायुसेनेतील हेलिकॉप्टर ची मागणी केली होती , या मागणीला केंद्रीय सरंक्षण मंत्रालयाने तात्काळ प्रतिसाद देत आज वायुसेनेतील सेवा समाप्त झालेले हेलिकॉप्टर नागपूरातील फुटाळा येथे नागरिकांसाठी स्थापन केले जात आहे.

फुटाळा येथे जागतिक दर्जाचे म्युझिकल फाऊंटेन उभारण्यासह विविध विकास कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहे . वायुसेनेतील हे हेलिकॉप्टर नागपूरच्या वैभवात नक्कीच भर पाडणारे ठरणार आहे .

A helicopter with the air force service of the MI-8 fleet in the service of the President, prime minister is being set up at Futala Lake in Nagpur to make the people feel affection and pride for our three armed forces.

 

Social Media