माझ्या वस्तीवर गणपती आला..

गणपती (Ganapati)ही बुद्धीची देवता आहे. पुरातन काळापासून गणेश पूजा(Ganesh Puja) केली जाते.
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” च्या गजरात श्रीगणेशाचं आगमन आमच्या पालावरच्या अभ्यासिकेत झालं. लहान लहान मुलं जसं जमेल तसं तयार होऊन एकत्र येतात काय| बाप्पाच्या नावाचा गजर करतात काय| सारखं आनंददायी, उत्साहवर्धक, प्रसन्न वातावरण|.
गावकुसाबाहेर पाल टाकून राहणाऱ्या, सदैव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करणाऱ्या या भटके-विमुक्त समाज बांधवांच्या वस्त्यांवर/ पालावर, ‘पालावरच्या अभ्यासिकां’ मधून गणपती उत्सव साजरा केला जातो.

गणपतीची-पूजा

महाराष्ट्रात(Maharashtra) जवळजवळ शंभर वस्त्यांवर आणि सत्तर पालावरच्या अभ्यासिका मध्ये गणपती बाप्पाचं(Ganapati Bappa) आगमन झालेलं आहे. काही वस्त्यांवर यावर्षी पहिल्यांदाच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.
चिखलठाणा येथील मसनजोगी समाज (Masanjogi community)वस्तीवरील मुलामुलींनी स्वतः छान छान गणपती मूर्ती तयार करून हा उत्सव साजरा करताहेत. विदर्भातील(Vidarbha) कुडवा-गोंदिया (Kudwa-Gondia)येथील पालावरचे शाळेत गेली तीन वर्ष गणपतीची स्थापना केली जाते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांचा यात सहभाग असतो. यावर्षी गायत्री परिवाराने आपला सहभाग यात नोंदविला.
निलंगा(Nilanga) येथील भिल्ल समाज(Bhil community) बांधवांचे वस्तीवर गणपती मांडला गेला. पुण्याच्या वैदू वाडीत स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या पालावरच्या शाळेत उत्साहात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. सुंदर आरास सुद्धा केली होती.
गणपतीची आरती करायला, फुलं (पुष्पांजली) वाहायला लहानग्यांना खूप हौस दिसून येते. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होत आहेत. नृत्य, संस्कार कथा, गीतं गायली जात आहेत.

गणपतीची-पूजा

“भाव तिथे देव” याचे सुंदर उदाहरण एका वस्तीवर बघायला मिळालं. छान आरास, सजावटच, गणपती बाप्पांना आवडते असं नाही, तर या आजींनी आपल्या पालातच म्हणजे झोपडीत प्लास्टिक छत तयार करून गणपतीची पूजा केली. किती हा भोळा भक्ती भाव बरं.
आज आपल्या धर्माबद्दल, उत्सवांबद्दल अनास्था दाखविली जाते. अशावेळी अगदी सकारात्मक भाव ठेवून आपल्या या कायमच दुर्लक्षित समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत भटके विमुक्त विकास परिषद, कल्याणकारी परिषद प्रयत्न करत आहेत.
संस्कृती रक्षक असलेला आपला हा समाज खोट्या आमिशांना बळी पडून अन्यत्र भरकटू नये, या साठी अशा उत्सवांची/उपक्रमांची या वस्त्यांवर नितांत गरज आहे.

गणपतीची-पूजा

या गणेशोत्सवा दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच आरोग्य शिबीर, स्वच्छता शिबीर, भजन, सामूहिक भोजन/प्रसाद सुध्दा असते.
काही वस्त्यांवर तर पोटासाठी भटकंती करायला गेलेले बांधव मुद्दामहून गणपतीसाठी वस्तीवर येतात. या दरम्यान अभद्र भक्षण (दारू-मांसाहार) बंद असते. किती मोठा बदल आहे हा|. “मी आणि माझी वस्ती” हा भाव हळूहळू रुजू होतोय समाजामध्ये.

शिक्षण हा केंद्रबिंदू मानून संपूर्ण महाराष्ट्रभर ७७(सत्याहत्तर) पालावरच्या अभ्यासिका कार्यरत आहेत. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
गजानन ही अशी देवता आहे की, कोणत्याही युगात त्यांचे स्मरण केलेअस्त आपल्या भक्तांना हवे ते देतात. गणपती म्हणजे सुखाचा सागरच.
तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। हेच मागणं याप्रसंगी गणरायांचे चरणी आम्ही मागतो.

 

श्रीकांत तिजारे
भंडारा ९४२३३८३९६६

असा आम्ही काय गुन्हा केला..

Social Media