नागपूर : 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर द्वारे “गंजीफा कार्ड ऑनलाईन चित्रकला कार्यशाळा” आयोजित केली जात आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन गूगल मीटद्वारे(Online Google Meet) आयोजित केला जाईल.
गंजीफा कार्ड हे कोकण, महाराष्ट्राचे पारंपरिक कलाप्रकार आहे. गंजीफा हा पत्त्यांच्या डेकसारखा खेळला जाणारा खेळ आहे. ते हाताने चित्रे काढून तयार केले जातात. ही परंपरा इराणमध्ये सुरू झाली, पण आता भारतात ही परंपरा सावंतवाडी, महाराष्ट्र आणि ओडिशा या ठिकाणी जिवंत आहे. या पारंपरिक कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत दशावतारी गंजीफा कार्डवरील चित्रकलेची खास शैली शिकवली जाईल, देशी खेळांना प्रोत्साहनही यातून देता येईल.
हा कलाप्रकार सावंतवाडी लॅकरवेअर संस्थेच्या गंजीफा कलाकार श्रीमती गायत्री कुलकर्णी शिकवतील. श्रीमती गायत्री कुलकर्णी या एक उत्तम कलाकार आहेत, त्या सतत त्यांच्या प्रतिभेला साद घालण्याचा प्रयत्न करत असतात. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायला त्या नेहमीच तयार असतात.
या कार्यशाळेत 25 सहभागींना प्रवेश दिला जाईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी, 29 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 4.00 पर्यंत, दिलेल्या मेलवर आणि या क्रमांकावर संपर्क करू शकता- sczcconlineworkshops@gmail.com / 9423399139, या कार्यशाळेतील सहभागींसाठी 500 रुपये शुल्क आकराण्यात आले आहे..