सबसे कातिल गौतमी पाटिल (Gautami Patil)या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल(Gautami Patil) ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
संजीवकुमार राठोड (Sanjeev Kumar Rathod)निर्मीत व दिग्दर्शित “द महाराष्ट्र फाईल्स”(The Maharashtra Files) या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटिल(Gautami Patil) थिरकताना दिसणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने( Maharashtra) गौतमी ला पारंपारिक वेशभूषेत पाहीले आहे. पण आता या चित्रपटात गौतमी ही एका हिंदी गाण्यावर डान्स बार गर्ल(Dance Bar Girl) च्या लुक मध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये गौतमी चे करोडो चाहते आहेत. या लुक मध्ये पाहण्याची उत्सुकता तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे. गौतमी ला डान्स बार गर्ल(Bar Girl) च्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ होत आहेत. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटात मोठी स्टार कास्ट आहे. “द महाराष्ट्र फाईल्स ” हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात, देशात व जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पहिल्याच दिवशी 850 चित्रपटगृहात रिलीज होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात संजीवकुमार राठोड हे। लेखक, निर्माते व दिग्दर्शक आहेत. संजीवकुमार राठोड यांनी माजी सेन्सर बोर्ड सदस्य, भारत सरकार मध्ये प्रदिर्घ काळ काम केले आहे.
या चित्रपटात मुख्य भुमिका मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी,नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशिल राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड
या चित्राटाताला संगीत नितीन-अजित, सिदार्थ कश्यप, संजय लोंढे यांनी दिले आहे. कला दिग्दर्शन उल्हास नान्द्रे व जगन्नाथ हातनकर व अफसर खान यांनी केले आहे गायन अजय अतुल फेम अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, साक्षी होळकर ,अमरिश आणि शांताबाई फेम संजय लोंढे, यांनी केले आहे. एडिटर- संजय इंगळे, कोरीयोग्राफर – विष्णु देवा, राहुल थोंबरे , संजीव हावलदार, प्रवीण सुर्यवंशी DOP – तनवीर मीर व नागराज दिवाकर. Costume Designer – धनश्री सालेकर हिदेन्द्र कपोपरा, जिम्मी, Background Score – मंगेश धाकडे साऊंड डिझाईन – कामोद खराडे,
या चित्रपटाची सहनिर्माती शालीनी राठोड व रोहीत चौधरी यांनी केली असून विक्रांत अंटील हे क्रियेटीव्ह प्रोडूसर आहेत. शादाब अख्तर व विकास मिश्रा हे कार्यकारी निर्माता आहेत संजय आर, किरण कोळी व सुनीता गोन्सलवीस हे प्रोडक्शन मॅनेजर आहेत, सोम चव्हाण यांनी व्हिज्युअल प्रोमोशन केले आहे.
डायरेक्टर टीम मध्ये असोशिएट डायरेक्ट – विक्रम सिंग चव्हाण , चीफ असिस्टंट डायरेक्टर – रवि धनवे, अँक्शन डायरेक्टर -संतोष दहीफळे असिस्टंट डायरेक्टर – विशाल पाटील, समिर गायकवाड, रूपेश पवार, निखील काळे व सोम्या आहेत. शालीनी राठोड ह्या क्रियेटीव्ह डायरेक्टर आहेत. या चित्रपटाला गीतकार गुरू ठाकूर ,संजय लोढे, शकील आझमी, डॉ विनायक पवार, सुशिल राठोड दीपक अंगेवार व अण्णा सुरवाडे आहेत.
हा चित्रपट सामाजिकरित्या वंचित व दुर्बल घटकावर व त्यांच्या समस्यावर आधारीत आहे. चित्रपटाचे लेखक निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड याच्यानुसार हा चित्रपट म्हणजे Common Citizen’s file आहे. हा चित्रपट कुठल्याही राजकिय पार्टी चा अंजेडा नाही आहे. सर्वसामान्य शेतकरी, विधवा महिला, विद्यार्थी यांची फाईल असून सर्व राजकिय पक्षांनी सर्व सरकारी व प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकत्यांनी आवर्जुन पहावे अशी विनंती केली आहे.
या चित्रपटाचे डायलॉग संजीवकुमार राठोड, सुशिल राठोड , विक्रमसिंग चव्हाण आणि रवि धनवे आहेत.
हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये सर्व थिएटरर्स , भारतात व जगभरात मिळून 850 चित्रपटगृहात 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये शांताबाई या फेमस गाण्यावर सनि लियोनी थिरकणार आहे. हरियानाची डान्सर सपना चौधरी पहिल्यांदा मराठमोळ्या रूपात दिसणार आहे. व गौतमी पाटिल ह्या डान्सबार गर्लच्या रूपात मराठी चित्रपटामध्ये हिंदी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे