तज्ज्ञांनी कॅन्सरच्या नवीन आव्हानांवर उपाय शोधले पाहिजेत : गिरीष महाजन

मुंबई : तज्ज्ञांनी कॅन्सरच्या (Cancer)नवीन आव्हानांवर उपाय शोधले पाहिजेत असे प्रतिपादन काल तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे मुंबईत आयोजन करण्यात आले, राज्याचे ग्राविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन(Girish Mahajan) हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील प्रसिध्द डॉ. चंद्रकांत अहिरे आदिं तज्ञ डॉक्टर्संनी या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन केले होते. मंत्री  महाजन म्हणाले, आज सर्वांना माहित आहे की, कॅन्सर सारखा आजार किती मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार तरुण ते वृद्ध लोकांमध्ये दिसतात. 2015 मध्ये महाराष्ट्रात 90 हजारांहून अधिक कॅन्सरचे रुग्ण नोंदवले गेले आहेत, 2025 पर्यंत ही संख्या 1.25 लाखांपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज आहे.

प्रत्येक व्यक्तीला सर्वोत्तम उपचार तसेच गरजु व्यक्तीस सवलतीच्या दरात सुविधा मिळाव्यात या करिता महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असुन, महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेवरील रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने 50 कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत अंतर्गत 5 लाख पर्यंतचे विमा संरक्षण तर दिलेच पण सोबतच मा. पंतप्रधान मोदाजींनी जेनेरीक मेडिसीनच्या माध्यमातुन स्वस्त औषधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातुन 9 वर्षात देशामध्ये जवळपास 5 करोड लोकांना मोफत वैद्यकिय उपचार भेटले आहेत.

लोकांमध्ये कॅन्सरबाबत जागृती निर्माण करण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत, कारण आपण पाहिले आहे की कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्ण कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात त्यामुळे कर्करोगाचे वेळेवर निदान व्हायला हवे. त्याकरिता चाचणी उपकरणे सर्वत्र स्वस्त आणि सहज उपलब्ध व्हायला हवीत. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे, तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट यांसारख्या वाईट सवयींमुळे तरुणांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्या संदर्भात शासनातर्फे जनजागृती मोहीम राबवली जाते असे श्री महाजन यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकूण 80 खाजगी आणि सरकारी कर्करोग रुग्णालये आहेत. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशभरातून गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात.मा. पंतप्रधान मोदीजींनी गेल्या 9 वर्षाच्या काळामध्ये आरोग्य व आरोग्यशिक्षणामध्ये खुप मोठे काम केले असुन 9 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ही 382 वरुन 693 एवढी झाली आहे, एम्स मध्ये जवळपास तीप्पट वाढ झाली असुन 8 वरुन ही संख्या 23 वर पोहोंचली आहे, देशामध्ये वैद्यकीय महाविद्यालय वाढल्यामुळे विद्यार्थीसंख्या दुप्पट झाली आहे. यामुळे अनेक आजारांवर उपचार करण्याची क्षमता हि कित्येक पटीने वाढणार आहे, यामुळे प्रत्येक रुग्णांस वेळेत उपचार भेटतील अशी अशा आहे.

महाजन पुढे बोलतांना म्हणाले की, मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, मी सुद्धा गेली 35 वर्षे गरीब व गरजु रुग्णांना मुंबई, पुणे, नागपूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याचे काम करत आहे. विनामुल्य आरोग्य महाशिबिरोचे आयोजन करून आम्ही महाराष्ट्रातील साडेतीन लाख रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्या शिबिरांमध्ये ग्रामीण स्तरावरही कॅन्सरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. या सर्व वाढत्या संख्येचा विचार करून, आम्ही महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देखील समर्पित कर्करोग युनिट सुरू केले आहेत. ज्यामध्ये प्राथमिक तपासणी आणि उपचार या दोन्ही सुविधा पुरविल्या जात आहेत. इंडियन कॅन्सर काँग्रेसच्या निमीत्ताने तज्ञ आणि अनुभवी कॅन्सर तज्ज्ञ मुंबईत जमले आहेत, त्यामुळे सर्वांनी कॅन्सरच्या नवीन आव्हानांबद्दल चर्चा करून त्यावर उपाय शोधले पाहिजेत, अशी अपेक्षा या निमीत्ताने मंत्री महाजन यांनी व्यक्त केली.

Social Media