सोन्याच्या किंमतीत बदल, पाहा आजचा दर..

नवी दिल्ली : सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. आज म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 134 रुपयांच्या वाढीसह 51039  रुपयांच्या पातळीवर उघडले. त्याचबरोबर चांदीची किंमत 1,922 रुपयांनी वाढली. सध्या सराफा बाजारात चांदीचा दर 62081 रुपये आहे.

आयबीजेएने दिलेला दर देशभर सर्वत्र स्वीकारला आहे. मात्र, यात देण्यात आलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. सोन्याची खरेदी व विक्री करताना आपण आयबीजेएच्या दराचा संदर्भ घेऊ शकता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, इब्जा(आयबीजेए)  देशभरातील 14 केंद्रांकडून सोने आणि चांदीचे सध्याचे दर गोळा करते.

आणि सरासरी किंमत देते. सोन्या-चांदीचा सध्याचा दर किंवा स्पॉट किंमत वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न असू शकतात, परंतु त्यांच्या किंमतींमध्ये थोडा फरक असतो.

Social Media