मुंबई : देशांतर्गत सराफा बाजारात सोमवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याच्या किमतीत 194 रुपयांची घसरण झाली. या घसरणीमुळे दिल्लीतील सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50,449 रुपयांवर आली आहे. सिक्युरीटीजच्या मते सोन्याच्या किंमतीतील ही घसरण कमकुवत होत असलेल्या जागतिक कलमुळे झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात 10 ग्रॅम सोन्याचे दर 50,643 रुपयांवर बंद झाले होते.
सोमवारी चांदीच्या भावात घसरण झाली. देशांतर्गत सराफा बाजारात चांदीच्या दरात सोमवारी प्रति किलो 933 रुपयांनी घट झाली आहे. चांदीचा दर 59,274 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. विशेष म्हणजे मागील सत्रात चांदी 60,207 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी रुपया कमकुवत असूनही दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट किंमतीतही 194 रुपयांनी घट झाली आहे. 18 पैशांच्या तुलनेत 73.79 (अस्थायी) वर बंद झाले.
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास सोमवारी सोन्या-चांदीचे दोन्ही भाव खाली घसरताना दिसून आले. आज सोन्याचे दर 1,857 डॉलर प्रति औंस झाले. त्याच वेळी चांदीची जागतिक किंमत प्रति औंस 22.70 डॉलरवर दिसून आली. तपन पटेल म्हणाले की, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या चर्चेची आणि चायनीज आकडेवारीची प्रतीक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांमुळे सोमवारी सोन्याच्या किंमतींवर दबाव होता. डॉलरमधील कमजोरी असूनही सोन्याच्या किमती मजबूत इक्विटी निर्देशांकांवर घसरल्या.