नवी दिल्ली : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने आणि जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक वातावरणामुळे सोने चांदीच्या किमतीत घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात 0.29 टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
रुपयाच्या दरात आज वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 31 पैशांनी मजबूत होऊन 73.38 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्याची आयात स्वस्त झाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबरसाठीचा सोन्याचा भाव 137 रुपयांनी कमी होऊन 47 हजार 401 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत. यासोबतच चांदीच्या सप्टेंबर साठीच्या वायदा दरात 105 रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. चांदी प्रति किलो 63 हजार 480 रुपयांवर ट्रेंड होत आहे. सॉवरेन गोल्ड बँक योजनेच्या सहाव्या सीरीजची सुरुवात देखील आजपासून सुरू झाली. यामध्ये 3 सप्टेंबर 2021 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड साठी (SGB) किंमत चार हजार 732 रुपये प्रतिग्राम निश्चित करण्यात आली आहे.
जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयने एक चांगली संधी आणली आहे बँक 30 ऑगस्ट पासून डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देत आहे ही गुंतवणूक तीन सप्टेंबर पर्यंत चालू असणार आहे. सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून ऑनलाईन अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना पन्नास रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सांगितले की गोल्ड बॉन्डची किंमत प्रतिग्रॅम 4,732 रुपये आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉन्डची किंमत प्रतिग्रॅम चार हजार 682 रुपये असेल. सरकारने मे 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत सहा हप्त्यांमध्ये सरकारी गोल्ड बॉन्ड जारी करण्याची घोषणा केली होती. आरबीआय भारत सरकारच्या वतीने बॉन्ड जारी करते. या बॉन्डची विक्री बँकांद्वारे (छोट्या वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळून) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट कार्यालये आणि मान्यताप्राप्त शेअर मार्केट नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसईच्या माध्यमातून केले जाते.
Gold and silver prices are seen to have come down in the wake of Sri Krishna Janmashtami. So today is a good day for gold buyers. Gold and silver prices have fallen as the rupee strengthened against the dollar and positive global markets. Gold prices on the Multi Commodity Exchange (MCX) have declined by 0.29%.