सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार; सोन्याचे भाव वधारले

मुंबई: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात मोठा बदल दिसून येत आहे.

आज कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात किंचित वधारले आहे. जागतिक बाजारात युएस कॉमेक्सवर सोन्याचे भाव 2,550 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहे. देशांतर्गत, सोन्याच्या बेंचमार्क म्हणजे मल्टीकमॉडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचा भाव 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करीत आहे. आजच्या चांदीच्या दरातही उसळी आली आहे. चांदीच्या भाव 29.85 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करीत आहे. राज्यातील शहरांमध्ये सोन्याच्या भावाची विवरणे खाली दिली आहेत:

मुंबई:

  • 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 65,835 रुपये
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 71,820 रुपये

पुणे:

  • 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 65,835 रुपये
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 71,820 रुपये

नागपूर:

  • 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 65,835 रुपये
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 71,820 रुपये

कोल्हापूर:

  • 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 65,835 रुपये
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 71,820 रुपये

जळगाव:

  • 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 65,835 रुपये
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम): 71,820 रुपये

▪️सोन्याच्या वायद्याची किंमत आज आठवड्याच्या सुरुवातीला वधारली असून सोन्याचा ऑक्टोबर वायदा 213 रुपयांच्या वाढीसह 71,852 रुपयांवर उघडला आहे.

▪️10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,950 रुपये आहे. एक किलो चांदीची किंमत 10 रुपयांनी घसरली असून 87,900 रुपयांना उपलब्ध आहे.

Social Media