सोन्याच्या वायदा भावात जोरदार तेजी, तर चांदी झाली स्वस्त…..

नवी दिल्ली : Gold Price Today: सोन्या-चांदीच्या वायद्या (भावी व्यवहार) भावात बुधवारी जोरदार तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) (MCX) सकाळी ११.५५ वाजता, ऑगस्ट २०२१ मध्ये वितरण केल्या जाणाऱ्या सोन्याचा दर ४३ रूपये म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी वाढून ४९,१७० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार करीत होता. याच्या मागील सत्रात म्हणजेच मंगळवारी ऑगस्ट २०२१ मध्ये वितरण केल्या जाणाऱ्या सोन्याचा दर ४९,१७० रूपये प्रति १० ग्रॅम होता. त्याचप्रमाणे ऑक्टोंबर २०२१ मध्ये वितरण केल्या जाणाऱ्या सोन्याचा दर ९० रूपये म्हणजेच ०.१८ टक्क्यांच्या वाढीसह ४९,४१५ रूपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार करीत होता.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) (MCX) जुलै, २०२१ मध्ये वितरण केल्या जाणाऱ्या चांदीची किंमत ३५ रूपये म्हणजेच ०.०५ टक्क्यांच्या घसरणीसह ७१,१९६ रूपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार करीत होती. याच्या मागील सत्रात जुलैमध्ये करार केल्या जाणाऱ्या चांदीची किंमत ७१,२३१ रूपये प्रति किलोग्रॅम एवढी होती. त्याचप्रमाणे सप्टेंबर २०२१ मध्ये वितरण केल्या जाणाऱ्या चांदीची किंमत सहा रूपये म्हणजेच ०.०१ टक्क्यांच्या घसरणीसह ७२,४२५ रूपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार करीत होती. मंगळवारी सप्टेंबर २०२१ मध्ये वितरण चांदीची किंमत ७२,४३१ रूपये प्रति किलोग्रॅम इतकी होती.

जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत (Gold Price in Global Market)-
ब्लूमबर्गनुसार, कॉमेक्सवर, ऑगस्ट २०२१ मध्ये वितरण केल्या जाणाऱ्या सोन्याचा दर १,८९४.४० डॉलर प्रति औंस होता. दुसरीकडे, हाजिर बाजारात (स्पॉट मार्केट) सोन्याचा दर १.५८ डॉलर म्हणजेच ०.०८ टक्क्यांच्या तोट्यासह १,८९१.३१ डॉलर प्रति औंसवर व्यापार करीत होता.

कॉमेक्सवर जुलै, २०२१ मध्ये वितरण केल्या जाणाऱ्या चांदीची किंमत ०.०६ डॉलर म्हणजेच ०.२२ टक्क्यांच्या घसरणीसह २७.६७ डॉलर प्रति औंसवर व्यापार करीत होती. त्याचप्रमाणे हाजिर बाजारात चांदीची किंमत ०.०४ डॉलर म्हणजेच ०.१५ टक्क्यांच्या घसरणीसह २७.५८ डॉलर प्रति औंसवर व्यापार करीत होती.
Gold Price Today: Gold futures price rises, silver becomes cheaper, know what has become of rate.


लॉकडाऊन असल्याने ‘या’ क्षेत्रातील सर्व कामे जवळपास ठप्प –

दुसर्‍या लाटेमुळे प्रभावित झालेल्या सेवा क्षेत्राला मिळणार 15,000 कोटी रुपयांचे स्वस्त कर्ज!

एलआयसी आयपीओ (LIC IPO) वर सर्वांचेच लक्ष –

देशातील सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओ संदर्भात सरकार घेणार ‘हा’ निर्णय!

Social Media