सोन्याचे भाव वाढले, चांदीही वाढली, काय आहेत किंमती जाणून घ्या

नवी दिल्ली : मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्यात प्रति दहा ग्रॅम 55 रुपयांची वाढ नोंदली गेली. या वाढीमुळे दिल्लीत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50,735  रुपयांवर गेली आहे. सिक्युरीटीजच्या मते जागतिक प्रवृत्तीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात सोमवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 50,680  रुपयांवर बंद झाले होते.

सोन्यासह चांदीचे स्पॉट भावही वाढले. मंगळवारी चांदीच्या दरात 170  रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीची किंमत 61,780 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. विशेष म्हणजे मागील सत्रात चांदी सोमवारी प्रतिकिलो 61,610  रुपयांवर बंद झाली होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, जागतिक पातळीवरील जोरदार कलमुळे दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत मंगळवारी 55 रुपयांची वाढ झाली आहे.

Social Media