सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ अजूनही कायम; जाणून घ्या आजचा दर…..

नवी दिल्ली : Gold Rate Silver Price in India 07 june 2021 : सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ अजूनही कायम आहे. जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी म्हणजेच आज (सोमवार) सोना-चांदी या दोन्ही धातूंच्या दरात वाढ झाली आहे. एकीकडे जेथे सोन्याचे भाव वाढले आहेत, तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. इंडियन बुलियन एँड ज्वेलरी असोसिएशननुसार, (India Bullion And Jewellers Association) आज (७ जून) सकाळी ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८७६० रूपये प्रती ग्रॅम आहे, ज्याची किंमत गेल्या आठवड्यात म्हणजेच शेवटच्या व्यापार दिवशी शुक्रवारी संध्याकाळी ४८५७८ रूपये प्रती १० ग्रॅम एवढी होती. तर, 07 जून रोजी चांदी देखील महाग झाली आहे. ९९९ शुद्धतेच्या चांदीचा दर (Silver) ७०,६६० रुपये प्रति किलो आहे. जो शुक्रवारी (4 जून) संध्याकाळी ७०१६७ रुपये प्रति किलो इतका होता.

मिस कॉलद्वारे सोने-चांदीची किंमत जाणून घ्या (Know the price of gold and silver by missed call)-

आयबीजेएद्वारे (India bullion and jewellers association) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांव्यतिरिक्त शनिवारी आणि रविवारी दर जारी केले जात नाहीत.२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस कॉल देऊ शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर मिळतील. याशिवाय सतत माहिती जाणून घेण्यासाठी www.ibja.com या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.

Gold and silver prices continue to rise. On the first trading day of the second week of June, ie today (Monday), the rate of both gold and silver metals has increased.


लॉकडाऊन असल्याने ‘या’ क्षेत्रातील सर्व कामे जवळपास ठप्प – 

दुसर्‍या लाटेमुळे प्रभावित झालेल्या सेवा क्षेत्राला मिळणार 15,000 कोटी रुपयांचे स्वस्त कर्ज!

एलआयसी आयपीओ (LIC IPO) वर सर्वांचेच लक्ष –

देशातील सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओ संदर्भात सरकार घेणार ‘हा’ निर्णय!

 

Social Media