ऐन दिवाळीत सोने चांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या; जाणून घ्या दर

नवी दिल्ली : धनत्रयोदशी आणि दिवाळीनंतर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत कमालीची घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मागील व्यापार आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये प्रति दहा ग्रॅमच्या एकूण 839 रुपयांची घसरण झाली. दुसरीकडे चांदीच्या दरात 2,074 रुपये प्रतिकिलोची मोठी घसरण नोंदली गेली. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार धनत्रयोदशी आणि दिवाळीसारख्या उत्सवांच्या निमित्ताने मागणी कमी झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये ही घट झाली आहे.  गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमती कशा वाढल्या ते पाहूया.

16 नोव्हेंबर 2020 :  या महिन्याच्या 16 तारखेला सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,246 रुपये होती. त्याचवेळी चांदीची किंमत प्रति किलो 64,101 रुपये होती.

17 नोव्हेंबर 2020 :  मंगळवारी सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 192 रुपयांनी घसरल्या. अशाप्रकारे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,054 रुपयांवर गेली. त्याचबरोबर चांदीचा दर 715 रुपयांनी घसरून 63,386 रुपये प्रति किलो झाला.

18 नोव्हेंबर 2020 :  मागील आठवड्याच्या बुधवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 427 रुपयांनी घसरून 50,627 रुपयांवर आला. दुसरीकडे चांदीची किंमत 781 रुपयांनी घसरून 62,605 रुपये प्रतिकिलोवर आली.

19 नोव्हेंबर 2020 :  गुरुवारी सोन्याची किंमत 283 रुपयांनी घसरून 50,344 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्याचबरोबर चांदीचा भाव 1,100 रुपयांनी घसरून 61,505 रुपये प्रति किलो झाला.

20 नोव्हेंबर 2020 :  शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 63 रुपयांनी वाढून 50,407 रुपये झाला. त्याचबरोबर चांदीची किंमत 522 रुपयांनी वाढून 62,027 रुपये प्रति किलो झाली.

एकंदरीत सोमवार ते शुक्रवार दरम्यान सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 839 रुपयांची घसरण झाली. दुसरीकडे चांदीच्या भावातही 2,074 रूपयाची जबरदस्त घसरण झाली.

Social Media