नवी दिल्ली : आज सकाळपासून सोन्या-चांदीत मोठी घसरण झाली असून सोन्याचा भाव 600 रुपयांच्या आसपास स्वस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज मात्र, दर काहीसा समाधानकारक आहे. रशिया-युक्रेन तणावामुळे सोन्याचे भाव वाढतच आहेत. मात्र, आज सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे.
आजचे सोन्याचे भाव काय आहेत?
आज सोने स्वस्त होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये एप्रिलमधील सोन्याचे वायदे तेजीसह व्यवहार करत होते. एमसीएक्सवर सध्या सोने 1.13 टक्क्यांनी घसरले आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 583 रुपयांनी घसरून 50,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. अशाप्रकारे आज सोने 51,000 पर्यंत खाली आले आहे.
चांदीमध्ये थोडीशी घसरण
सोन्याच्या दरात घसरण होत असतानाच चांदीच्या दरातही घसरण होत आहे. चांदीच्या दरात आज 1,200 रुपयांची घट झाली असून गुंतवणूकदारांना चांदीमध्ये गुंतवणूक आणि खरेदी करण्याची मोठी संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये आज चांदीचा भाव 1,217 रुपयांनी किंवा 1.84 टक्क्यांनी घसरला. जर आपण चांदीच्या मार्च फ्युचर्स किमतीवर नजर टाकली, तर चांदी 64,814 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.