मुंबई : आजकाल नागरिक आर्थिक व्यवहार ऑनलाईन (Online)करण्यावर अधिक भर देतात. मात्र आता तुम्ही जर गुगल पे(Google Pay) वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
आता गुगल पे(Google Pay) ने वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क(Facility charges) आकारण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही बिल भरण्यासाठी क्रेडिट(Credits) किंवा डेबिट कार्ड(Debit cards) वापरत असाल, तर तुमच्याकडून ०.५ ते १% शुल्क आकारले जाणार आहेत.
या शुल्काव्यतिरिक्त, तुम्हाला जीएसटी (GST)देखील भरावा लागेल. आतापर्यंत गुगल पे ने बिल पेमेंटसाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले नव्हते.
त्यामुळे आता गुगल पे वापरकर्त्यांवर अधिकचा भार पडणार आहे.
अल्पसंख्यांक शाळा मान्यते बाबतच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांची स्थगिती…?