पर्यटन क्षेत्राला वित्तमंत्र्यांचा दिलासा देण्याचा प्रयत्न, पर्यटक मार्गदर्शकांना मिळणार १ लाखापर्यंत कर्ज….

नवी दिल्ली : वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे वाईटरित्या प्रभावित असलेल्या पर्यटन क्षेत्राला देखील वित्तमंत्र्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रवास आणि पर्यटन (Travel & Tourism sector) क्षेत्रासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ‘५ लाख पर्यटकांना मोफत पर्यटक व्हिसा (free Tourist visas) दिला जाईल. याची मर्यादा ३१ मार्च २०२२ पर्यत असेल. ’ त्यांनी सांगितले की, पर्यटकाला एकदाच याचा फायदा मिळेल.

पर्यटन क्षेत्राला दिलासा, पर्यटक मार्गदर्शकांना मिळणार १ लाखापर्यंत कर्ज….

Relief to tourism sector, tourist guides to get loans up to Rs 1 lakh.

वित्त राज्यमंत्री यांनी सांगितले की, ११ हजार नोंदणीकृत पर्यटक मार्गदर्शकांना आर्थिक सहकार्य मिळेल. सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या उपाययोजनेअंतर्गत प्रवास आणि पर्यटन भागधारक(Travel & Tourism Stakeholders(TTS) ) लोकांना १० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. तर, परवानाधारक पर्यटक मार्गदर्शकांना (registered tourist guides) १ लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशाप्रकारे सरकारने पर्यटक मार्गदर्शक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित इतर लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू….. – 

वित्तमंत्र्यांनी सांगितले की, हे कर्ज १०० टक्के हमीसह असेल. त्यांनी सांगितले की, कर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही आणि सोबतच वेळेआधी कर्जाची परतफेड केल्यास देखील कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. तसेच या कर्जावर कोणत्याही अतिरिक्त संपार्श्विक (कॉलेटरल) आवश्यकता भासणार नाही.

वित्त राज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले की, या योजनेचा फायदा १०,७०० पर्यटन मार्गदर्शकांना मिळेल. ५ लाख पर्यटकांना मोफत व्हिसा मिळाल्याने पर्यटन क्षेत्र रूळावर येण्यास मदत होईल. त्यांनी सांगितले की, सन २०१९ मध्ये १ कोटीहून अधिक पर्यटक भारतात आले होते. असे पर्यटक सरासरी २१ दिवसांपर्यत भारतात राहतात. नियमित सुमारे २४०० रूपये खर्च करतात. ही योजना पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत लागू असून यावर एकूण १०० कोटी रूपयांचा खर्च होईल.
Government’s gift to Travel & Tourism sector, big announcements made, Tourist Guides will get loan.


आनंददायी हवामानाची मजा घेण्यासाठी शिमल्यात पर्यटकांची गर्दी…. –

शिमल्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी हॉटेलांमधील व्यवसायात लक्षणीय वाढ…

पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ‘फागू’ हे ठिकाण सर्वोत्तम! –

पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ‘फागू’ हे ठिकाण सर्वोत्तम!

Social Media