राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार प्रदान

मुंबई :  उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)यांनी आज येथे केले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ (Mumbai Ratna Awards)पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. फिल्म्स टुडे, नाना नानी फाउंडेशन व एनार समूहातर्फे सदर पुरस्कार देण्यात आले.

रतन टाटा, आदी गोदरेज, आयुक्त इक्बाल सिंह चहल, निरंजन हिरानंदानी, उज्वल निकम, उदित नारायण, मंजू लोढा सन्मानित

Ratan Tata, Adi Godrej, Commissioner Iqbal Singh Chahal, Niranjan Hiranandani, Ujjwal Nikam, Udit Narayan, Manju Lodha honoured

राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ञ डॉ गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय, डॉ शोमा घोष, आशिष चौहान आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व वेदांत समूहाचे अनिल अगरवाल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. कार्यक्रमाला फिल्म्स टुडेचे अध्यक्ष श्याम सिंघानिया व राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.

Ratan Tata, Adi Godrej, Commissioner I S Chahal, Manju Lodha, Niranjan Hiranandani presented ‘Mumbai Ratna’ Awards

Chairman Emeritus of Tata Group Ratan Tata, Godrej Group Chairman Adi Godrej, Municipal Commissioner Iqbal Singh Chahal, Vedanta Group Chairman Anil Agarwal, construction leader Niranjan Hiranandani were among 31 eminent leaders conferred with the ‘Mumbai Ratna’ Awards in Mumbai on Monday (19th July).

Governor Bhagat Singh Koshyari presented the awards at a function held at Raj Bhavan, Mumbai.

The Mumbai Ratna Awards given for exceptional service in various walks of life have been instituted by the Films Today Media Ltd, Nana Nani Foundation, and Enarr Group. Chairman of Films Today Shyam Singhania and Managing Director Rajesh Shrivastava were present.

Ratan Tata and Vedanta Group Chairman Anil Agarwal were honored in absentia.

Public Prosecutor Ujjwal Nikam, Dr. Gautam Bhansali, Manju Lodha, playback singer Udit Narayan, Bhajan singer Anup Jalota, CMD of Union Bank Rajkiran Rai, Dr. Shoma Ghosh, BSE MD Ashish Chouhan were among those who presented the Mumbai Ratna Awards.


शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पूर्वनियोजित होती : नवाब मलिक –

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पूर्वनियोजित होती : नवाब मलिक

Social Media