राज्यपालांनी घेतला हिंगोलीच्या सिंचन अनुशेष, तसेच प्रलंबित विकास कामांचा आढावा

हिंगोली : राज्य मंत्रिमंडळाचा अघोषित बहिष्कार असतानाही कालपासून तीन जिल्ह्यांच्या दौ-यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी काल शासकीय बैठका आणि उदघाटनाचे कार्यक्रम टाळले होते. मात्र आज त्यांनी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबत माहिती घेतली.

मंत्र्यांना अहवाल सादर करणार

Submit report to minister

यावेळी राज्यपालांनी हिंगोलीचा सिंचन अनुशेष, तसेच प्रलंबित विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यानी माध्यमांशी संवाद साधला आणि अर्धवट स्थितीत असलेल्या विकास कामांबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.

ताफ्यातील ३ गाड्यांची धडक

Collision of 3 cars in the fleet

दरम्यान राज्यपालांनी संत नामदेव यांच्या जन्मगावी नरसी नामदेव येथे भेट दिली.  यावेळी जाताना त्यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांची धडक होवून किरकोळ अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले माहिती मात्र कुणालाही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती मिळली आहे.
Governor Bhagat Singh Koshyari, who has been on a tour of three districts since yesterday, had avoided government meetings and inauguration programs despite an unannounced boycott of the state cabinet. However, today, he held a meeting of the heads of the collectorate at Hingoli and inquired about the facilities, irrigation, drinking water arrangements in the district.

Social Media