मराठा आरक्षण मोर्चा रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरु

मराठा आरक्षण(Maratha reservation) संदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला मोर्चा आज नवी मुंबईत पोहोचणार आहे. लाखोंच्या संख्येंने असलेले आंदोलनकर्ते आज मुंबईत धडकणार आहेत.

त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत. लाखो मराठा (Maratha)आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत आले तर मुंबई(Mumbai) विस्कळीत होईल. यामुळे नियोजन बिघडण्याची आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता मनोज जरांगेंची समजूत घालण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मुंबई कृषीउत्पन्न बाजार समिती दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलनकांनी तिथेच थांबावे यासाठी सरकारकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Social Media