मुंबई : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहोळ्याचा आज दिमाखदार सोहोळ्यात झाला समारोप. दुसऱ्या महायुद्धकाळातील ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांच्या डच माहितीपटाने मिफ्फ-2022 चा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्णशंख पुरस्कार जिंकला.
मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या मिफ्फ-2022 या, माहितीपट,लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते.
मल्याळम लघुपट ‘साक्षात्कारम’ आणि फारो लघुपट ‘ब्रदर ट्रोल’यांना सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रिय मंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते यंदाच्या मिफ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.