मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका युवतीवर झालेल्या बलात्कारानंतर दिल्लीतील इस्पितळात तिचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरले आहे, याचा परिणाम सोशल मीडियावरही दिसून येत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या प्रकरणाबद्दल धक्का बसला आहे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री परिणीती चोप्रा ने ट्विटरवर ह्यूमन्स ऑर मॉन्स्टर या नावाने एक चिठ्ठी लिहिली ज्यामध्ये ती म्हणाली- मी त्यांना प्राणी म्हणणार नाही, कारण आपल्यातील काही जे बनले आहेत त्यांच्या तुलनेत प्राणी निष्ठावंत आणि प्रामाणिक असतात. जर त्या लोकांना मानव म्हटले तर मला स्वत:ला माणूस म्हणायला लाज वाटेल. मला क्षमा कर हाथरस..तसेच करीना कपूर खानने तिच्या इन्स्टा स्टोरीत पीडित मुलीला न्याय मागत दुःख व्यक्त केले.
ट्विटरवर या प्रकरणाबाबत #HathrasHorrorShocksIndia ट्रेंड होत आहे. पोलिसांनी मंगळवारी रात्री महिलेवर केलेल्या अंत्यसंस्काराबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत ट्विटरवर एक व्हिडीओ सामायिक केला जात आहे, ज्यावर यामी गौतमने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, प्रतिक्रिया व्यक्त करताना हा व्हिडिओ पाहणे भीतीदायक अनुभवापेक्षा कमी नाही. मी पूर्णपणे निश:ब्द झाले आहे. कुटुंबातील दुःख आणि असहायतेपणाचा अंदाज लावू शकत नाही, लाजिरवाणे.
अभिनेत्रीपासून राजकारणी झालेल्या नगमाने या घटनेविषयी आणि बळीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. नगमा यांनी लिहिले की, तिचा अचानक मृत्यू होतो यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे. दिल्लीच्या इस्पितळात कुटुंबाला भेटण्याची परवानगी देखील दिली जात नाही.
मल्लिका शेरावतने हाथरस हॉरर आणि निर्भया केस हॅशटॅग सोबत लिहिले की, जोपर्यंत भारत स्त्रियांबद्दल मध्ययुगीन मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही.