राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व डॉक्टर सेलच्या माध्यमातून कोकणासह ६ जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी १३५ पेक्षा जास्त आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीरे…

मुंबई : राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून कोकणासह ६ जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी १३५ पेक्षा जास्त आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीरे( medical camps) घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.

महाराष्ट्रातील कोकणासह एकूण ६ जिल्हयात पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला. काही दिवस काही भाग पाण्याखाली राहिल्याने वित्त व जिवितहानी झाली. पूराचे पाणी घरात व परिसरात बराच काळ राहिल्यामुळे रोगराईचा मोठा धोका निर्माण होणार असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मदतीचा हात पुढे केला व पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत पोचविण्याच्या सूचना डॉक्टर सेलला केल्या. त्यानुसार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने डॉक्टरांच्या मदतीसाठी दहा रुग्णवाहिका व डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करुन दिली. तर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या(Chemists and Druggists Association) माध्यमातून मुबलक व सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती.

आरोग्य-तपासणी-व-मोफत-औषधोपचार शिबीरे

डॉक्टर सेलच्या २०० डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात खोकला, ताप, सर्दी, उलटी, संडास, बचाव कार्यात झालेल्या छोट्या- मोठ्या जखमा, लेप्टोस्पायरॉसिस(leptospirosis), पायांना बुरशी आदी आजारांवर उपचार केले. काही गावात रस्ता वाहून गेल्यामुळे औषधांचे साहित्य डोक्यावर घेत डॉक्टरांनी बाधित लोकांची सेवा केली.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट(Nationalist Welfare Trust) व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सर्व जिल्हयातील पूरग्रस्त भागात आरोग्य शिबीरे घेतली तर सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्हयातील काही भागात अजून शिबीरे घेण्यात येणार आहेत.

medical-camp

राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीमध्ये जनतेला वैद्यकीय मदत असेल किंवा यापूर्वी २०१९ चा पश्चिम महाराष्ट्रातील पूरावेळीही आणि कोरोना महामारीत, मराठवाड्यातील दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक समुपदेशन आदी कामात अग्रेसर राहिला आहे.

medical-camp

या वैद्यकीय शिबिरांच्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अरुण लाड, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, माजी आमदार संजय कदम, माजी आमदार रमेश कदम, सत्यजित पाटणकर, अनिल साळोखे, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, आमदार सुनिल शेळके, नितीन देशमुख, फ्रंटल व सेल समन्वयक सुहास उभे यांचे सहकार्य लाभले.

More than 135 health check-ups and free medical camps have been conducted for flood victims in six districts including Konkan through NCP welfare trust and nationalist doctor cell. Given by Narendra Kale.

Social Media