नागपुरात गारठलेल्या प्राण्यांसाठी लागले हिटर

नागपूर : विदर्भात काही दिवसांपासून कमी होत असलेल्या तापमानामुळे एकीकडे नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत असतांना नागपुरात असलेल्या प्राणी संग्रहालयतील प्राण्याचं थंडी पासून बचावासाठी हिटर लावण्यात आलेत… नागपुरातील पारा मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही निच्चांकीवर होता. मंगळवारी सकाळी भारतीय हवामान विभागाच्या हवामान नोंदणी केंद्रानं तापमान 7 पूर्णांक 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद केली. सलग तिसऱ्या दिवशी बोचऱ्या थंडीमुळं नागपूरकरांसह महाराजबाग आणि बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील वन्यजीव हैराण झाले होते.

बोचऱ्या थंडीत वाढ झाल्यानं दोन्ही प्राणी संग्रहालयातील वन्यजीवांसाठी प्रशासनानं हिटरची व्यवस्था करीत प्राण्यांना ऊब निर्माण करून दिली. प्राणी संग्रहालयातील पाण्याचे तापमानही घसरल्यानं अॅक्वा संग्रहालयातील फिशटँकमध्येही ऊब निर्माण करण्यासाठी व ऑक्सिजनची पातळी संतुलित रहावी यासाठी खास लाइट्स व हिटरची व्यवस्था करण्यात आली…

गेल्या आठवडाभरापासून नागपुरातील पारा घसरणीवर असून सोमवारी 7.8 अंश सेल्सिअसची नोंद नागपुरात करण्यात आली. मोसमातील हे सर्वांत निच्चांकी तापमान असल्याचं सांगण्यात येतय. कडाक्याच्या वाढत्या थंडीत मिळालेल्या हिटरची उब ही प्राण्यासाठी जीवन रक्षक ठरत आहे.

Social Media