चारठाणा परिसरात मुसळधार पावसाचा कहर; गोद्री नदीला पूर

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणासह (Charthana)परिसरातील गावांमध्ये आज सकाळी चारतास मुसळधार पाऊस झाला. या धुवाधार पावसाने चारठाणा येथील काझी मोहल्ला परिसरातील मरकज मज्जीद परिसराला पुराचे पाणी पोहचले तर बाजार परिसरातील घराला पुराच्या पाण्याने वेढा मारला होता. या पुरामुळे ग्रामीण भागातील अनेक गावाचा संपर्क चार तास तुटला गेला होता.

चार तास तुटला होता ग्रामीण गावांचा संपर्क

Rural villages were cut off for four hours

दरम्यान दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. मागील दोन दिवसापूर्वीच पावसाने दमदार प्रमाणात हजेरी लावली होती. शनिवारी सकाळपासूनच धुवाधार पावसाला सुरूवात झाली. चारठाणासह परिसरातील नदी नाल्याना पुर आला तर आनेक शेतकर्‍याच्या शेतात पाणी शिरले गेले. गावालगत असलेल्या गोद्री नदीला देखील पूर आल्याने कसबा पेठ विभागाचा चार तास संपर्क तुटला गेला होता. चार तासानंतर काहीनी पुराच्या पाण्यातून घर गाठले. मागील दोन दिवसांपासून पाऊसाची कमी आधिक प्रमाणावर रिपरिप सुरूच आहे. दरम्यान शनिवारी सकाळपासूनच पावसाने दमदार प्रमाणात हजेरी लावली. चारठाणासह परिसरातील नदी नाल्यांना पुर आला होता. नेहमीप्रमाणे गावातील मध्यभागी असलेल्या गोद्री नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक तास वाहतूक ठप्प झाली होती तर बाजार परिसरातील आनेक घराला पुराच्या पाण्याने वेढा मारला होता. मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी समाधानी झाला होता. दरम्यान, मागील तीन दिवसापूर्वी झालेल्या पाऊसाने नदी नाले तुडुंब प्रमाणात भरून वाहत होते.तर शनिवारच्या पाऊसाने जनजिवन विस्कळीत झाले होते.

शेतात पाणीच पाणी (Water in the field -)

सततच्या पावसाने नदी काठच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच शनिवारी झालेल्या धुवाधार पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असुन शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला या पावसाचा मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग अडचणीत आल्याचे चित्र आहे.

अनेक गावांचा संपर्क तुटला(Many villages were cut off.)-

या पावसामुळे परिसरातील अनेक गावातील नदी – नाल्यांना पुर आल्याने संबधित गावांच्या नागरिकांना घराच्या बाहेर पडता आले नाही. त्यामुळे चारठाणा परिसरातील अनेक गावांचा चारठाणा व जिंतुर या तालुक्याच्या ठिकाणी संपर्क तुटला होता. दुपारी १२ च्या सुमारास मुसळधार पावसाने थोडी उघडीप दिल्याने परिसरातील नदी – नाल्यांचे पाणी अोसरु लागल्याचे चित्र दिसुन आले.

पाझर तलाव झाले अोव्हरफुल (Pazar Lake becomes everfull)

सततच्या पावसाने परिसरातील चारठाणा,कान्हा,जांभरुन,हलविरा, कोठा,रायखेडा आदी गावातील पाझर तलाव आधीच अोव्हरफुल झाले असुन या तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहु लागले आहे.

Villages in the area including Charthana in Jintur taluka received heavy rainfall for four hours this morning. The heavy rain caused floodwater to reach the Markaj Majzid area of Qazi Mohalla area of Charthana while the house in the Bazar area was surrounded by floodwater. Many villages in rural areas were cut off for four hours due to the floods.


निर्यातदारांसाठी ‘वाणिज्य उत्सव’  संमेलनाचे पुणे येथे आयोजन –

निर्यातदारांसाठी ‘वाणिज्य उत्सव’ संमेलनाचे पुणे येथे आयोजन

Social Media