मुंबई : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व. अरुण पौडवाल(Arun Paudwal) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा `कृतज्ञता गौरव पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध ध्वनिमुद्रक हेमंत पारकर(Hemant Parkar) यांना सोमवारी रात्री सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल(Anuradha Paudwal) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्व. अरुण पौडवाल यांच्या जन्मदिनी , म्हणजेच 9 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता हा समारंभ पौडवाल यांच्या खार (पश्चिम) येथील राहत्या घरी पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये 51,000/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे यंदाचे 25 वे वर्ष आहे.
आजवर या पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर पुढीलप्रमाणे : संगीतकार राम कदम, पार्श्वगायक जी. मल्लेश, संगीतकार यशवंत देव, प्रभाकर जोग, दत्ता डावजेकर, अशोक पत्की, संगीत संयोजक श्यामराव कांबळे, तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, भावगीत गायक अरुण दाते, गिटार वादक रमेश अय्यर, ध्वनिमुद्रक डी. ओ. भन्साळी, अविनंदन टागोर, सत्येन पौडवाल, युवा गायक गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी, मदन काजळे.
श्री. हेमंत पारकर ध्वनिमुद्रक साउंड रेकॉर्डिस्ट
अल्प परिचय
1982 पासून ते आत्तापर्यंत रेकॉर्डिस्ट म्हणून 40 वर्षांची प्रदीर्घ अनुभवी अशी कारकीर्द
1982 ते 1984 – (मेहबूब स्टुडिओ मध्ये सहाय्यक)
1985 ते 1993 – (श्री साउंड स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिस्ट)
1993 ते 2008 – (सुदीप स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिस्ट)
2008 ते 2010 – (फ्री लान्स काम)
2011 ते 2019 – (डी.आर. मल्टिमीडिया मध्ये)
2019 ते 2022 – (सध्या ग्राव्हिटी स्टुडिओ मध्ये कार्यरत)
लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, मेहदी हसन, किशोरकुमार, सोनू निगम, पंकज उदास, सुदेश भोसले नामवंत गायक व कल्याणजी आनंद जी, अरुण पौडवाल, अनिल मोहिले, लक्ष्मीकांत प्यारेलाल, भप्पी लाहिरी, रवींद्र जैन, अनु मलिक, राजकमला, राम लक्ष्मण अशा श्रेष्ठ संगीतकारांबरोबर त्यांनी गाणी ध्वनिमुद्रित केली.
शहनाज गिलने ट्यूब टॉप घालून केले हॉट फोटोशूट, बोल्डनेस पाहून चाहते झाले घायाळ