भंडारा : स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नती साध्य करून महिलांपुढे आदर्श ठेवणाऱ्या भंडारा शहरातील हेमलता बबन मोटघरे यांची ही कहाणी… त्यांनी शंभराहून अधिक महिलांना प्रशिक्षित करून त्यांच्या रोजगारासाठी त्यांनी हातभार लावला आहे..लग्न होवून आल्या तेव्हा आर्थिक परिस्थिती बिकटच होती बऱ्याच दिवसाच्या संघर्षानंतर त्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या गुणाला पारखलं आणि त्यालाच आपले शस्त्र मानत दिवसरात्र त्या शिवणकामात व्यस्त झाल्या आणि कोणालाही सहजासहजी जमणार नाही अशा फिनिशिंगसह कापडी पिशव्या त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली…आज त्यांच्या या कार्याची दखल सर्व स्तरातून घेतली जात आहे..त्यांच्याशी बातचित केली आमच्या प्रतिनिधी हर्षना रोटकर यांनी पाहुया ही विशेष मुलाखत…