हिमोग्लोबिन
हिमोग्लोबिन(Hemoglobin) हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Moleमहत्वत्वपुर्ण कार्य करतात. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो आयर्न (लोह) आणि प्रोटीन (प्रथिने) यापासून बनलेला असतो.
हिमोग्लोबिन टेस्ट – HB test in Marathi :
रक्त परिक्षणाद्वारे हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते. 10 ते 15 मिनिटात HB Test पूर्ण होते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्तातील ऑक्सीजनच्या वहनाची क्षमता कमी होते. ज्यामुळे लाल रक्त-कणिकांची (RBC रक्तातील लाल पेशींची) संख्या कमी होते आणि अनीमिया होतो. जर शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर भरपूर कमी असेल तर किडनी रोग, रक्ताची कमतरता, कँसर, पक्षाघात यासारखे आजार होऊ शकता. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सुस्ती येणे अशा समस्या येऊ निर्माण होतात.
कोणकोणत्या कारणांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते..? :
☞ अयोग्य आहाराच्या सेवनामुळे, पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे मुख्यतः आहारातील लोह, ब-12 जीवनसत्व, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
☞ जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने. उदा. अपघातामुळे, शस्त्रक्रियेवेळी रक्तस्त्राव होणे, मुळव्याध किंवा मलाशयाचा कैन्सर, पोटाचा कैन्सर या विकारात रक्तस्त्राव झाल्यामुळे,
☞ किमोथेरपी औषधांच्या दुष्पपरिणामातून,
☞ किडन्यांचे विकार उद्भवल्याने, किडन्या निकामी झाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे व घरगुती उपाय :
हिमोग्लोबिन कसे वाढवावे याची माहिती आत्ता जाणून घेऊया. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी बीट, काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, सफरचंद ही फळे खावीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. हे रक्तातील हीमोग्लोबीनची निर्मीती करते आणि लाल रक्तकणांच्या सक्रियतेला वाढवते.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार :
☞ हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजे. या व्यतिरिक्त तीळ, पालक, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, नारळ, शेंगदाणे, गुळ, मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल.