शिमला : हिमाचल(Himachal) प्रदेशात सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गामुळे पर्यटन व्यवसाय प्रभावित झाला आहे. राज्यातील ९५ टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना टाळे लागले आहेत, ढाबे ओसाड पडले आहेत. पर्यटन व्यवसायाशी संबंधित राज्यातील सुमारे ७.५० लाख लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. कोरोना कर्फ्यूमुळे 90 टक्के भाडेपट्टीधारकांना काम सोडावे लागले आहे. शिमला, मनाली, धार्मशाळा आणि डलहौजी मधील बहूतांश हॉटेल्स बंद झाले आहेत.
हिमाचलमध्ये कोरोना कर्फ्यूमुळे पर्यटन व्यवसाय प्रभावित!
Tourism business affected by corona curfew in Himachal!
शिमल्यातील माल रोड मधील अल्फासह इतर रेस्टॉरंट बंद झाले आहेत. हॉटेल मालकांनी कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठविले आहे. चायल मधील ९० टक्के हॉटेल्स बंद आहेत. तर मनाली मध्ये हॉटेल्स व्यतिरिक्त होम स्टे आणि बेड ऍण्ड ब्रेकफास्ट इत्यादी बंद करण्यात आले आहे. डलहौजी मध्ये देखील पर्यटकांचा ओघ थांबल्यानंतर पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. संकटाच्या वेळी सरकारकडून दिलासा न मिळाल्याने पर्यटन व्यवसायिक निराश झाले आहेत.
फेडरेशन ऑफ हिमाचल हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष अश्वनी बांबा, उपाध्यक्ष संजय सूद, चायल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र वर्मा यांचे म्हणणे आहे की, सबवेशन योजनेचा फायदा हॉटेलवाल्यांना मिळत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, खोल्यांच्या संख्येच्या आधारे जीएसटी देण्यात यावा. सहकारी बँकेसह इतर सर्व बँकांचा या योजनेत समावेश करण्यात यावा.
Tourism business has been badly affected in Himachal Pradesh due to Corona hit for the second consecutive year. 95 percent of the hotels and restaurants in the state have been locked.
घोडेस्वारी व्यवसाय ठप्प झाल्याने चालकांसमोर घोड्यांच्या देखभालीची समस्या निर्माण –