Himachal Tourism : हिमाचलमध्ये पर्यटनासाठी प्रवेश सुरू होण्याची शक्यता….

शिमला, Himachal Tourism News : हिमाचल सरकार(Himachal government), राज्यात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांत घट झाल्याने अनलॉक प्रक्रियेत अनेक प्रकारचे निर्बंध कमी करण्याच्या विचारात आहे. या निर्बंधांमध्ये पर्यटकांना प्रवेश देणे याचा देखील समावेश आहे. ५ जून रोजी प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन अर्थव्यवस्था उघडण्याबाबत चर्चा होईल. यावर विचार केला जात आहे की ७२ तासाच्या आरटीपीसीआर नकारात्मक(निगेटिव्ह) अहवालाऐवजी आरएटी म्हणजेच रॅपिड एँटीजन टेस्ट अहवालाच्या आधारे पर्यटकांना प्रवेश देण्यात यावा. तसेच पर्यटन व्यवसायिकांद्वारे सरकारसमोर ही बाब देखील उपस्थित करण्यात आली की सध्या केवळ दोन टक्के पर्यटकच येत आहेत.

कोरोना कर्फ्यू मध्ये सरकारद्वारे अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये आरटीपीसीआर अहवालाची अट काढून टाकावी अशी संपूर्ण पर्यटन उद्योगाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या व्यवसायात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे राज्यातील १५ लाख लोक जोडले गेले आहेत. ज्यांची रोजीरोटी पर्यटनावर अवलंबून आहे. राज्यातील पर्यटन व्यावसायिकांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर ही मागणी केली आहे.

पर्यटन उद्योगात हॉटेल व्यवसायिक, होम स्टे व्यावसायिक, टॅक्सी ऑपरेटर्ससह स्थानिक पातळीवर शेतकरी आणि बागेतील उत्पादकांचा देखील यामध्ये समावेश आहे. राज्यातील अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राची सुमारे १० टक्के भागीदारी आहे.

राज्यात गेल्या एका आठवड्यादरम्यान कोरोना संसर्गाच्या प्रकरणांत दहा टक्क्यांनी घट झाली असून अशा परिस्थितीत सुमारे १ हजाराहून कमी प्रकरणे समोर येत आहेत आणि मृत्यूची संख्या देखील कमी होऊन आता तीस किंवा त्याच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत सरकारवर अनलॉक प्रक्रियेत विविध सवलती देण्याचा दबाव असेल.
The Himachal government is contemplating to ease many restrictions in the unlocking process after the rapid decline in the cases of corona infection in the state. Such restrictions also include opening of entry for tourists.


गौतमबुद्ध वन पशू अभयारण्यात ‘Eco-tourism park’ बांधण्यासाठी वनविभागाचा सरकारकडे प्रस्ताव!

गौतमबुद्ध वन पशू अभयारण्यात ‘Eco-tourism park’ बांधण्यासाठी वनविभागाचा सरकारकडे प्रस्ताव!

Social Media