कोकणातील पहिली हाऊसबोट सुरू करणारा युवक सत्यवान दरदेकर !

केरळ मध्ये कोट्यावधी पर्यटक बॅकवॉटर टुरिझम(Backwater tourism) साठी जातात. एका अलेप्पीच्या खाडीमध्ये(Gulf of Alleppey) 1000 हून अधिक हाऊस बोट(House boat) आहे, आणि दीड / दोन हजार कोटीची एका नदीची अर्थव्यवस्था आहे.

हे कोकणात आजपर्यंत झाले नाहीत कारण हाऊसबोट साठी कोकणात परवानग्या दिल्या गेला नाहीत. मात्र गेली अनेक वर्ष आपण मी स्वतः आणि आपली टीम याचा पाठपुरावा करतोय. आणि आनंदाची गोष्ट कोकणामध्ये पहिल्या दोन हाऊस बोट ला अधिकृत परवानगी मिळाल्या. ही हिंमत करणारा पहिला युवा उद्योजक सत्यवान दरेकर. दाभोळ आणि राजन कुमठेकर मालवण. या दाभोळ खाडीतील हाऊस बोट(House boat) ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

पुढील काळात दिघी(Dighi,), बाणकोट दाभोळ(Bankot Dabhol), जयगड(Jaigarh), पूर्णगड(Purnagad), जैतापूर(Jaitapur) ,विजयदुर्ग(Vijaydurg), देवगड, आचरा ,तारकर्ली ,आरोंदा, कोकणातील खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर टुरिझम सुरू होईल. कोकणातील तरुणांना सोबत घेऊन हजारो कोटीची अर्थव्यवस्था पुढच्या काळात निर्माण होऊन आणि याकरता ग्लोबल कोकण – कोकण चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेईल अशा स्वरूपाचे प्रकल्प उभारणार्‍या तरुणांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभी राहील.

यापुढे शासकीय यंत्रणांची दादागिरी कोकणात चालणार नाही जे निसर्ग पूरक आणि चांगले उद्योग कोकणात करता येणे शक्य आहे त्याला परवानगी मिळायलाच पाहिजे.

शिमगा उत्सवात कोकणी तरुणांसाठी पहिली कोकण व्हिजन 2030 परिषद खेड येथे ऐनवली या गावात आयोजित केली होती. यावेळी सत्यवान दरदेकर यांनी येऊन आपले मनोगत व्यक्त केले.

संजय यादवराव
ग्लोबल कोकण – कोकण चेंबर ऑफ कॉमर्स ( पर्यटन मत्स्य उद्योग आणि कृषी उद्योग )
कोकण क्लब
कोकण भूमी प्रतिष्ठान

संपर्क सत्यवान ९८८१३८३२२८/
९४०४६५२२६५

Social Media