कोरोनाचा नवा प्रकार नियोकोव्ह किती घातक आहे?

मुंबई : जग सध्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन(omicron) प्रकाराशी लढत आहे. अशातच या धोकादायक विषाणूचा आणखी एक प्रकार नियोकोव्हने (NeoCov) शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. पण हा नवीन प्रकार मानवासाठी घातक आहे का? जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता याबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, वृत्तानुसार नियोकोव्हने (NeoCov) हा प्रकार दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळून आला आहे. परंतू हा प्रकार मानवासाठी घातक आहे का, यावर अजून संशोधन करण्याची आवश्यकता आहे. रशियन वृत्तसंस्था ‘तास’ नुसार, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की त्यांना वुहान शास्त्रज्ञांच्या नवीन शोधाची माहिती आहे. हा प्रकार मानवावर परिणाम करेल की नाही? त्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की मानवामध्ये होणार्‍या संसर्गाचे 75 टक्के स्त्रोत प्राणी आणि विशेषतः वन्य प्राणी आहेत. प्राण्यांमध्येही कोरोना विषाणू आढळून आला आहे. यामध्ये वटवाघळांचाही समावेश आहे, जे विविध प्रकारच्या विषाणूंचे नैसर्गिक वाहक म्हणून ओळखले जातात. चिनी संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधात या नवीन प्रकाराचा उल्लेख केला आहे.

त्यांचा दावा आहे की हा विषाणू जास्त जोखमीचा आहे आणि त्याचा प्रसार होण्याचा दरही खूप जास्त आहे. वुहानमधील शास्त्रज्ञांच्या एका शोधनिबंधानुसार, नियोकोव्ह (NeoCov) मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम किंवा एमईआरएस-कोरोना विषाणूशी संबंधित आहे. हा शोधनिबंध बायोरेक्सिव या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे आणि अद्याप त्याचे पुनरावलोकन करण्यात आलेले नाही.

संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित, असे सांगण्यात आले आहे की एमईआरएस-कोव्ह हा बीटा-कोव्ह (Merbecovirus) चा वंश सी शी संबंधित आहे, जो सुमारे 35 टक्के उच्च मृत्यू दरामुळे एक मोठा धोका बनला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की अभ्यासात एमईआरएसशी संबंधित विषाणूमध्ये एसीई2 च्या वापराचे पहिले प्रकरण दिसून आले आहे. यात मृत्युदर आणि संक्रमण दर दोन्ही जास्त आहेत.

Social Media