नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुलांवर किती प्रभाव पडेल याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांचे अनेक वेगवेगळे दावे समोर येत आहेत. या संदर्भात जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि एम्स (AIIMS)ने केलेले संशोधन समोर आले आहे. माध्यमांनी या सर्वेक्षणाचा हवाला देताना म्हटले आहे की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुलांवर अधिक प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे.
सर्वेक्षणात वृद्धांच्या तुलनेत मुलांमध्ये सार्स-कोव्ही-२ चा सीरो पॉझिटिव्हिटी दर अधिक होता. हा सर्वे देशातील पाच राज्यांमध्ये करण्यात आला आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, सार्स कोव्ही-२ चा सीरो पॉझिटिव्हिटी दर मुलांमध्ये वृद्धांच्या तुलनेत अधिक आढळून आला आहे त्यामुळे अशी शक्यता नाही की भविष्यात कोव्हिड-१९चे सध्याचे स्वरूप दोन वर्षाच्या आणि त्याहून अधिक वर्षांच्या मुलांना अधिक प्रभावित करेल.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या अस्तित्वाबद्दल इशारा देणारा ‘कोव्हिड अलार्म’ उपकरण विकसित
रक्तातील एका विशिष्ट प्रकारच्या प्रतिपिंडाची उपस्थिती म्हणजे सीरो-पॉझिटिव्हिटी होय. अभ्यासाचे अंतरिम परिणाम मेडआरएक्सिव्ह मध्ये जारी करण्यात आले आहेत. हे परिणाम ४,५०९ सहभागींच्या मध्यम-मुदतीच्या विश्लेषणावर आधारित आहेत. यामध्ये २ ते १७ वर्ष वयोगटातील ७०० मुलांना तर १८ किंवा त्याहून अधिक वयोगटातील ३,८०९ लोकांना सहभागी करण्यात आले. हे लोक पाच राज्यांतून घेण्यात आले होते. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये अधिक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास
१८ वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये सीरोची उपस्थिती ५५.७ टक्के आढळून आली तर, १८ वर्षावरील सहभागींमध्ये ६३.५ टक्के असल्याचे आढळून आले. अभ्यासात असे आढळून आले की, शहरी ठिकाणांच्या तुलनेत (दिल्ली) ग्रामीण भागात सीरो पॉझिटिव्हिटी दर कमी आढळून आला. हा अभ्यास १० हजार लोकसंख्या असलेल्या पाच निवडक राज्यांमध्ये केला जात आहे. तर आकडेवारी मिळविण्याचा कालावधी १५ मार्च ते १५ जून होता. अभ्यासासाठी दिल्ली शहरी पुनर्वसन कॉलनी, दिल्ली ग्रामीण, भुवनेश्वर ग्रामीण क्षेत्र, गोरखपूर ग्रामीण क्षेत्र आणि अगरतला ग्रामीण क्षेत्रातून नमुने घेण्यात आले होते.
तरीही सरकारने तिसऱ्या लाटेबाबत सावधानगिरी बाळगण्यास सांगितले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी क्षमता वाढविण्यासाठी काम सुरू केले पाहिजे. मुलांच्या रूग्णालयांमध्ये कोरोना संक्रमित मुलांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था केली पाहिजे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की, कोव्हिड रुग्णालयांमध्ये मुलांची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र तयार केले जावे ज्या ठिकाणी मुलांसोबत त्यांच्या पालकांना येण्या-जाण्याची परवानगी असेल.
How much will the third wave of Corona have on children, WHO and AIIMS did a survey, know the results.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार!
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार, प्रकरणांत ५० टक्क्यांनी वाढ…