कोरोना साथीनंतर पर्यटन व्यवसाय कसा विकसित करावा?

मुंबई : दरवर्षी १९ मे हा दिवस चीन (china) मध्ये पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. ३० मार्च २०११ चीनी राज्य परिषदेने प्रस्ताव ठेवून दरवर्षी १९ मे रोजी चीनी पर्यटन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाचे म्हणजे हा दिवस चीनच्या मिंग राजवंशातील महान पर्यटक, इतिहासकार आणि साहित्यिक शु श्याखो यांच्याशी संबंधित आहे, कारण त्यांनी तीस वर्षांमध्ये चीनच्या अर्ध्याहून अधिक प्रदेशांचा दौरा केला आहे, आणि पर्यटनाविषयी अनेक लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखामध्ये ‘थ्येनथा पहाड’ यात्रा सर्वात प्रसिद्ध आणि जुनी आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, १९ मे १६१३ मध्ये शु श्याखो यांनी त्यांच्या यात्रेला सुरूवात केली, त्यामुळे हा दिवस चीनमध्ये पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्याच्या कोरोना (corona) साथीमुळे विविध देशांच्या सीमा बंद कराव्या लागल्या आणि पर्यटन व्य़वसायावर सर्वाधिक परिणाम झाला. तथापि, या साथीच्या परिस्थितीनंतर पर्यटन व्यवसाय कसा विकसित करावा?

 १९-मे-रोजी-चीनी-पर्यटन-दिवस

कोरोना (corona)साथीच्या परिस्थितीनंतर प्रथम, आजूबाजूच्या क्षेत्रात पर्यटन आणि शहरांमध्ये मनोरंजन हे कदाचित दोन मुख्य दिशानिर्देश बनतील, कारण आधूनिक शहरी जीवनात लोकांना तणाव आणि दबाव जाणवतो. लोकांना हे कमी करण्यासाठी एक मार्ग निवडणे गरजेचे आहे, तर आजूबाजूच्या भागात पर्यटन करणे आणि मनोरंजन करणे हा एक सर्वात सोयीचा मार्ग आहे. दुसरे म्हणजे, सांस्कृतिक निर्मितीमुळे पर्यटनाला नवीन चालना मिळेल.

तिसरे म्हणजे ऑनलाईन हे देखील एक प्रमुख वाहक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे पर्यटन उद्योगाला ‘स्मार्ट टुरिझम’ (smart tourism)साठी नवीन ढाच्या (blueprint) तयार करण्यास मदत मिळेल. नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती, व्यापकपणे सांस्कृतिक पर्यटन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या
सखोल एकत्रीकरणाला मजबूत करेल. ऑनलाइन वापर, अनुभवात्मक वापर आणि स्मार्ट पद्धत भविष्यात फायदेशिर ठरेल.

How to develop tourism business after the corona epidemic? Tourism in the surrounding areas and entertainment in the cities will probably become the two main directions.

हे सुद्धा वाचा…Indian Railways : प्रवाश्यांनी लक्षात घ्यावे, रेल्वेने लांब पल्ल्याच्या 56 गाड्या केल्या रद्द –

Indian Railways : प्रवाश्यांनी लक्षात घ्यावे, रेल्वेने लांब पल्ल्याच्या 56 गाड्या केल्या रद्द

Social Media