ब्लॅक फंगसचा हाहाकार : ‘या’ राज्यांनी संसर्गजन्य आजार म्हणून केले घोषित!

मुंबई : देशात ब्लॅक फंगस black fungus (म्यूकरमाइकोसिस) ने हाहाकार माजवला आहे. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये ब्लॅक फंगस (काळी बुरशी) वेगाने पसरत आहे. अशाप्रकारे गुजरात मध्ये ११६३ प्रकरणे समोर आली आहेत, आणि ६१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू ओडिशा, गुजरात, चंदीगढ, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनी ब्लॅक फंगसला संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केले आहे.

काळ्या बुरशीचे राज्यांवर संकट, डॉक्टरांना औषध संकटाची भीती!

Black fungus crisis on states Doctors fear drug crisis!

आकडेवारीनुसार या राज्यांपैकी ब्लॅक फंगसची (काळी बुरशी) सर्वात कमी प्रकरणे बिहार मध्ये १०३ प्रकरणे आढळली आहेत आणि दोघांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड मध्ये १०१ रूग्णांमध्ये म्यूकरमाइकोसिस ची पुष्टी करण्यात आली आहे आणि एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये ९० रूग्ण आढळून आले आहेत, तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये देखील ब्लॅक फंगसचे ९७ रूग्ण आहेत, येथे मृत्यूचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. उत्तर प्रदेश-हरियाणा मध्ये आतापर्यंत ८-८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेश मध्ये ब्लॅक फंगसची एकूण ५७५ प्रकरणे समोर आली आहेत आणि सरकारी आकडेवारीनुसार ३१ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. उत्तर प्रदेशमध्ये १६९ लोकांमध्ये ब्लॅक फंगस असल्याचे निदान झाले आहे आणि ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दिल्लीमध्ये २०३ रूग्ण आढळून आले आहेत. आणि एकाचा मृत्यू झाला आहे. हरियाणा मध्ये २६८ रूग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात इंजेक्शनची कमतरता :

Shortage of injections in Maharashtra

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात १५००हून अधिक रूग्ण आढळले आहेत त्यापैकी ८५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांनी सागितले की, एका रूग्णाला सरासरी ६० ते १०० इंजेक्शन लागू शकतात. अशा परिस्थितीत सरासरी दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. वेळेत गंभीर रूग्णांना इंजेक्शन न मिळाल्यास आजार अधिक गंभीर होतो त्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता असते.
दिल्लीच्या खासगी रूग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ते कोरोना रूग्णांवर तर उपचार करीत आहेत परंतु औषधांसाठी सरकारकडे अर्ज करावा लागत आहे. अशा परिस्थितीत औषध मिळण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे रूग्णांची स्थिती वेगाने खालावत आहे. डॉक्टरांना अशी भीती आहे की, ऑक्सीजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन प्रमाणेच ब्लॅक फंगसचे देखील संकट उद्भवू शकते. त्यावेळी रूग्णांचा जीव वाचविणे कठीण होईल.
Black fungus (mucoramycosis) is causing havoc in the country. Especially in Maharashtra, Gujarat and Madhya Pradesh, black fungus is spreading fast.


कोरोना काळात फुफ्फुसांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक! –

कोरोना काळात व्यायाम करून फुफ्फुसांना ठेवा फिट!

Social Media