गोरेगाव येथील फिल्म स्टुडियोला भीषण आग

मुंबई : मुंबईतील गोरेगाव(Goregaon) येथील फिल्म स्टुडियोला भीषण आग लागली असून आगीची बातमी मिळताच आग विजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या च्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत .आग विजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सुमारे 50 ते 60 कलाकारांना आगीतून सुखरूप बाहेर काढले असून कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.

गोरेगाव येथील बांगुर नगर येथे आदीपुरुष या चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे. अभिनेता सूर्या याचे या ठिकाणी चित्रीकरण होत होते अचानक मं साडे चार वाजता आग लागली आगीची माहिती मिळताच 40 ते 50 कलाकारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले .यामुळे मोठी हानी टळली. सेट वरील खुर्च्या व इतर लाकडी फर्निचर आगीत जळून खाक झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने भयंकर पेट घेतला परंतु कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Tag-A huge fire broke out at a film studio in Goregaon

Social Media