भभूआ : कैमूर जिल्ह्यातील पर्वतांच्या आनंददायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील लोक दररोज मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. सर्वाधिक तेल्हाड कुंड धबधबा पाहण्यासाठी महिला आणि पुरूषांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने तरूण येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत तेल्हाड कुंड, करकटगड, जगदहवा धरण आणि दुर्गावती जलाशय यासह कैमूरच्या अनेक ठिकाणी सहलीसाठी लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
कैमूर जिल्ह्यामध्ये अधौरा डोगराळ प्रदेशात अनेक सुंदर स्थळे आहेत. जेथे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात लोक आपापल्या पद्धतीने फिरण्याचा कार्यक्रम निश्चित करतात. लोक त्यांच्या मित्र- परिवारासह या ठिकाणी येतात आणि कैमूरमधील पर्वतांच्या विहंगमय दृष्यांचा आनंद घेतात. यावेळी जून महिन्यात अधिक पाऊस पडल्याने कैमूरच्या धबधब्यात अधिक पाणी साठले आहे. त्यामुळे धबधब्याच्या ठिकाणांचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक सहल काढत आहेत.
तेल्हाड कुंड येथे भभूआ अधौरा मार्गे जाता येते. या मार्गावर लहान आणि मोठ्या वाहनांद्वारे सहजरित्या पोहोचण्याची सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश लोक त्यांच्या खासगी वाहनांद्वारे स्थळांना भेट देत आहेत आणि धबधब्याचा आनंद घेत आहेत. याव्यतिरिक्त लोक धरती माता मंदिरात जाऊन आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तेथील मातेच्या चरणाशी डोके टेकतात. तेल्हाड कुंड येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने संपूर्ण बंदोबस्त करावा, असे अनेक सहलीला येणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही.
Bihar Tourism: Hundreds of people arriving to enjoy the pleasant weather in the valleys of Kaimur