औरंगाबाद थंडीने गारठले, थंडीत रंगताहेत शेतशिवारात हुरडा पार्ट्या

औरंगाबाद : राज्य थंडीने गारठले असतानाच शेतशिवारांमध्ये गहु , मका ज्वारी , बाजरी च्या हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. हुरडा खाण्याचा आनंद शेतकरी घेत असून ,थंडीमध्ये हुरड्यापासुन एक उर्जा त्यांना मिळत आहे.

मराठवाड्यात औरंगाबादसह बहुतांश जिल्ह्यात गतवर्षी  पाऊस  चांगल्या प्रमाणात झालेला असल्याने विहीरींमध्ये पाण्याचे प्रमाण  चांगले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पूर्वहंगामी  मिरचीच्या  पिकानंतर  उत्पन्नात वाढ व्हावी व अतिवृष्टीमुळे खरिपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिसरातील  जास्तीत  जास्त  शेतकर्यांनी पाण्याचे योग्य प्रमाणात नियोजन करून रब्बीचे असलेले पिक म्हणजेच  गहु, हरबरा व उन्हाळी मका  या पिकाची  लागवड मोठ्या प्रमाणावर  केली असुन सध्या हे पिक चांगलेच बहरात व हूरड्यात आले आहे.

सुटीच्या  दिवशी नागरिक मित्र परिवारासह  गावाकडे येत असून शेतशिवारांमध्ये ठिकठिकाणी   हुरडा खाण्याच्या  पार्ट्या रंगू लागल्याचे चित्र  परिसरात बघायला मिळत आहे. शेतशिवारांमध्ये या हुरडा पार्ट्या  रंगू लागल्या आहे. शहरांमध्ये असे पदार्थ काही खायला मिळत नाही त्यामुळे खास सुट्या टाकुन आपल्या गावाकडे येऊन नागरिक या हुरडा पार्ट्या करण्याचा आनंद घेत आहोत.

शहरात आयता  तयार विकत घेऊन खालेल्या हुरड्यात व गावाकडे  शेतात जाऊन स्व्तःच्या  हाताने भाजुन त्याला मिठ लिंबु तीळ गुळ आदी  पदार्थ  लावुन गरम  गरम  हुरडा खाण्यात जी मजा आहे ती शहरातल्या तयार करून मिळणाऱ्या हुरड्यात येत नाही. शेतामध्ये येऊन हुरडा खाण्यात जी मजा असते ती शब्दात वर्णन करणे  अवघड  असल्याचे आहे .तर सध्या थंडीचे प्रमाणही खुप वाढलेले असल्याने व हा गरम गरम हुरडा खाल्याने शरीराला एक वेगळीच उर्जा मिळत आहे.त्यामुळे सध्या शेतशिवारांमध्ये हा गरम गरम हुरडा खाण्याला मोठी पसंती मिळत आहे .

Social Media