डेल्टा प्लस व्हेरिएंटला सभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण मानने चुकीचे : आयसीएमआर वैज्ञानिक

नवी दिल्ली : भारतात प्रथमच आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटला सभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण असल्याचे मानने सध्या अति घाईचे ठरेल. याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वैज्ञानिकांनी सांगितले की, सध्या तिसऱ्या लाटेसाठी अधिक चिंतीत होण्याची आवश्यकता नाही.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे वैज्ञानिक आणि महामारी विज्ञान आणि संसर्गजन्य रोग विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, आतापासूनच तिसऱ्या लाटेसाठी चिंता करणे योग्य ठरणार नाही. महत्वाचे म्हणजे डेल्टा प्लस तज्ज्ञांद्वारे ओळख पटलेला कोरोनाचा एक प्राणघातक व्हेरिएंट (प्रकार) आहे. याबाबत वैज्ञानिक अभ्यास करीत आहेत. भारतात या व्हेरिएंटची बहुतांश प्रकरणे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळली आहेत. आरोग्य मंत्रालयाने या राज्यांच्या प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय तीव्र करण्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. अग्रवाल यांच्या मते, ‘एमआरएनए विषाणूची ही एक सामान्य प्रवृत्ती आहे ज्याचे उत्परिवर्तन होते. हे उत्परिवर्तन अपरिहार्य आहे, आम्ही उत्परिवर्तन नियंत्रित करू शकत नाही. जसजसा वेळ जाईल आपल्याला त्याच्या प्रवृत्तीबद्दल माहिती होईल. सुरूवातीला अल्फा व्हेरिएंट होता, त्यानंतर डेल्टा आणि आता डेल्टा प्लस.’ डॉ. सुमित यांनी असेही सांगितले की, भविष्यात आणखी बदल पहायला मिळू शकतात. त्यांनी सांगितले की, व्हेरिएंटची तीन लक्षणे आहेत ज्यांची ओळख झाली आहे.
It is too early to tell Delta Plus the reason for the third wave, ICMR scientists said – don’t be too worried.


डेल्टा व्हेरिएंटने लोकांची चिंता वाढविली, आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळल्याची नोंद : डब्ल्यूएचओ –

वेगाने पसणाऱ्या Delta variantने लोकांची चिंता वाढविली आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळल्याची डब्ल्यूएचओने दिली माहिती

Social Media