IDBI Bank : IDBI बँकेसाठी बिड सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची शक्यता

मुंबई : आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank)खाजगीकरणासाठी प्रारंभिक बोली भरण्याची अंतिम मुदत जवळपास एक महिन्याने वाढवली जाण्याची शक्यता आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

ते म्हणाले की एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट किंवा प्रारंभिक बोली दाखल करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर आहे, ती जानेवारीपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. व्यवहार सल्लागारांना टाइमलाइन वाढवण्यासाठी काही विनंत्या मिळाल्या आहेत.

सरकार आणि LIC यांना IDBI बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकायचा आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे परदेशी गुंतवणूक बँका काम करणार नाहीत, त्यामुळे मुदत वाढवली जाईल. “जानेवारीच्या सुरूवातीला काही तारखेपर्यंत बोली सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली जाईल,” असे ते म्हणाले.

आयडीबीआय बँकेतील एकूण ६०.७२ टक्के हिस्सा विकून बँकेचे खाजगीकरण करण्यासाठी सरकारने ७ ऑक्टोबर रोजी निविदा मागवल्या होत्या. या वित्तीय संस्थेतील हा हिस्सा सरकार एलआयसीच्या सहकार्याने विकणार आहे. यासाठी, बोली जमा करण्याची किंवा स्वारस्य पत्र (EOI) सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली होती.

Social Media