नागपूरात उन्हाचा पारा ४५ पार : वाढते तापमान लक्षात घेता शहरातील सिग्नल बंद….

नागपूर : नागपुरातील वाढत्या उन्हामुळे पशु, पक्षी यांच्यासह सामान्य नागरिक देखील हैराण आहेत.

विदर्भासह नागपूरात उन्हाचा पारा ४५ पार असून पुढे तो वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक देखील बाहेर पडायला बघत नाहीत पण काम असल्यावर बाहेर पडावं लागत टोपी, स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे लागते.

सिग्नलवर उभे राहल्यावर 1 मिनिटातच अंगातून घामाच्या धारा बाहेर पडत असतात त्यामुळे अंगाची लाहिलाही होत असते. वाढत्या उन्हापासून लाहीलाही होणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा आणि त्यांना सिग्नलवर जास्त उभे राहण्याची गरज पडू नये यासाठी नागपूर पोलिसांनी दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून दुपारी १२ ते ४ दरम्यान शहरातील २१ सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दुपारच्या रखरखत्या उन्हात सिग्नल वर उभे राहून नागरिकांचा जीव मेटाकुटीला येतो या सोबतच पोलिसांना देखील दुपारी सिग्नल वर ड्युटी करताना उन्हाचा सामना करावा लागतो, यावर हा तोडगा असून कमी ट्रॅफिक असलेल्या सिग्नल वर प्रायोगिक तत्वावर सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त डॉ सारंग आव्हाड यांनी दिली.

Social Media