पालक(spinach) :
पालकामध्ये कॅल्शियम(calcium) चांगल्या प्रमाणात आढळते. जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर तुमच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करणे फायद्याचे असते. सर्वात महत्वाचं म्हणजे पालक खाल्ल्याने हाडांना 25 टक्के कॅल्शियम मिळते.
दही(yogurt) :
दहीमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. दुधापेक्षा जास्त दही खाल्ल्यास कॅल्शियम जास्त मिळते. त्यामुळे हाडांच्या समस्यांपासून सुटका मिळवायची असल्यास आहारात दुधाचा समावेश करावा.
बदाम (almond):
व्हिटॅमिन ई सोबतच प्रथिने, झिंक आणि कॅल्शियम देखील बदामामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदाम केवळ मेंदूच तीक्ष्ण बनवत नाही तर हाडेही मजबूत करतो.
अननस(pineapple) :
अननसमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याशिवाय अननसामध्ये(pineapple) पोटॅशियम देखील जास्त प्रमाणात आढळते.