नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर देशात महागाई देखील नवीन विक्रम स्थापित करीत आहे. मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित महागाई (WPI) आतापर्यंत १२.९४ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात घाऊक महागाई १०.४९ टक्क्यांवर होती. सलग दोन महिन्यांपासून घाऊक महागाईने दुप्पट आकाडा पार केला आहे. सरकारद्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी याच कालावधीत म्हणजेच मे २०२० मध्ये घाऊक महागाई -३.३७ टक्के होती. सरकारचे म्हणणे आहे की, लोअर बेस इफेक्ट आणि कच्चे तेल, पेट्रोल-डिझेलसह (petrol-diesel)इतर खनिज तेल, उत्पादित वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाई वाढली आहे.
घाऊक महागाईत वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांच्या समोर नवीन समस्या झाली निर्माण
Rise in wholesale inflation creates new problems for middle class
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली दरम्यान, डाळींमध्ये १२.०९ टक्के, कांदा २३.२४ टक्के, फळांमध्ये २०.१७, तेलबियांच्या किंमतीत ३५.९४ टक्के आणि कच्चा पेट्रोलियम च्या किंमतीत १०२.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान पेट्रोलच्या दरात ६२.२८ टक्के, डिझेलमध्ये ६६.३ टक्के आणि भाज्यांच्या दरात ५१.७१ टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये देखील प्रचंड वाढ होती यापूर्वी कच्चे तेल, पेट्रोल-डिझेल च्या दरात वाढ झाल्याने एप्रिल २०२१ मध्ये घाऊक महागाई १०.४९ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मार्च, २०२१ च्या तुलनेत यामध्ये सुमारे ७.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात घाऊक महागाई केवळ ३.१ टक्के होती. त्याचप्रमाणे फेब्रुवारी मध्ये ४.१७ टक्के होती. कोरोना संसर्गामुळे त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीयांसमोर महागाई आता नवीन समस्या बनली आहे. नियमित वापरल्या जाणाऱ्या किराणा मालाच्या किंमतीत एका वर्षात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
New record of wholesale inflation, increase in oil-pulses-vegetables, middle class household collapsed.
देशाच्या विदेशी चलन साठ्यात ६०० अब्ज डॉलर्सचा विक्रम –
देशाच्या विदेशी चलन साठ्यात ६०० अब्ज डॉलर्सचा नवीन विक्रम प्रस्थापित!