नवी दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेलचे किरकोळ दर विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचले असताना भारताने तेल निर्यात देशांची संघटना ‘ओपेक’वर कच्च्या तेलाची किंमत कमी करण्यासाठी दबाव टाकला आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत ७५ डॉलर प्रती बॅरल च्या वरती पोहचली आहे. ही किंमत एप्रिल २०१९ नंतर सर्वात जास्त आहे. भारताने ‘ओपेक’ला सांगितले की, किंमत ‘तर्कसंगत’ श्रेणीत ठेवले जावे आणि उत्पादक देशांनी तेल उत्पादनातील कपात आता टप्प्याटप्प्याने करावी. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे.
कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ किंमत विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०० रूपयांपेक्षा जास्त आहे. तर, राजस्थान आणि ओडिशामध्ये डिझेल प्रतिलिटर १०० रूपयांच्या वर विकले जात आहे.
भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओपेक चे सरचिटणीस मोहम्मद सानुसी बरकिंदो यांच्याशी केलेल्या आभासी बैठकीत कच्च्या तेलाच्या किंमतीबद्द्लची चिंता व्यक्त केली.
उल्लेखनीय आहे की सौदी अरेबियासारखे ओपेक देश पारंपारिकपणे कच्च्या तेलाचे सर्वात मोठे स्रोत आहेत आणि भारत त्यांच्याकडून तेलाची आयात करत आहे. परंतु गेल्या काही काळापासून ओपेक आणि त्याचे सहयोगी देश ज्यांना ओपेक प्लस म्हटले जाते, ते भारताच्या तेल उत्पादन वाढविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या कच्च्या तेलाच्या आयातीसाठी नवीन स्रोत शोधावे लागत आहेत. मे मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीत ओपेक देशांकडून होणाऱ्या तेलाच्या आयातीचा वाटा कमी होऊन ६० टक्के राहिला होता आणि मागील महिन्यात ७४ टक्के होता.
ओपेकद्वारा घेण्यात आलेल्या आभासी बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारत तेल आयात करणारा प्रमुख ग्राहक आहे ही गोष्ट लक्षात घेऊन मंत्री प्रधान यांनी आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी इंधनाच्या स्वस्त किंमतीविषयी आणि नियमित पुरवठा करण्याचे महत्व अधोरेखित केले आहे. ’
Crude oil became record expensive after 2019, India increased pressure on OPEC countries to keep prices low.
रेटिंग संस्था S&P ने कमी केला विकास दराशी संबंधित अंदाज! –
मूडीजनंतर आता रेटिंग संस्था S&P ने कमी केला विकास दराशी संबंधित अंदाज!