नागपुरात ९४ वा भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा; माजी वायुसैनिकांनी दिली अमर जवानांना मानवंदना

भारतीय वायुसेना दिन २०२६ : भारतीय नभ योद्ध्यांना सलाम; नागपुरात ९४ वा भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा

नागपूर : “नभः स्पृशं दीप्तम्” अर्थात अभिमानाने आकाशाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य असलेल्या भारतीय वायुसेनेचा ९४ वा

वर्धापन दिन नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पूर्व वायुसैनिक कल्याण संघटना (ईवान), नागपूरच्या

वतीने गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी अजनी चौक येथील अमर जवान स्मारक परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भारतीय वायुसेना दिन २०२६
नागपुरातील अजनी चौक येथील अमर जवान स्मारक परिसरात ९४ वा भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतीय वायुसेना दिन २०२६ : अमर जवानांना श्रद्धांजली आणि विद्यार्थ्यांकडून मानवंदना

कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता

व्यक्त करण्यात आली. प्रहार मिलिटरी स्कूल, रवीनगर येथील विद्यार्थ्यांनी अमर जवानांना मानवंदना दिली. यानंतर

उपस्थित माजी वायुसैनिकांनी भारतीय वायुसेनेतील आपल्या सेवाकाळातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

आज भारतीय वायुसेना ही जगातील तिसरी शक्तिशाली वायुसेना असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. भारतीय

वायुसैनिकांच्या शौर्य, त्याग आणि समर्पणाला उपस्थितांनी सलाम केला.

या कार्यक्रमाला एअर व्हाइस मार्शल प्रशांत करकरे (निवृत्त), व्हाइस अॅडमिरल किशोरजी ठाकरे (निवृत्त) आणि

ब्रिगेडियर सुनील गावपांडे (निवृत्त) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून

उपस्थितांना भारतीय वायुसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय वायुसेना दिन २०२६
नागपुरातील अजनी चौक येथील अमर जवान स्मारक परिसरात ९४ वा भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

माजी सैनिक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती

प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. ईवानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत

नांदरुणकर यांनी स्वागतपर भाषण केले, तर ईवानचे सचिव अजय गाढवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. नरेंद्र शहाणे

यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश बारापात्रे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एअर व्हेटरन गुरुदत्त खातखेडे, सचिन खेडीकर, महेश आंबोकर, श्रीकांत गंगाधडे,

ओमप्रकाश शिरपूरकर, राजू धांडे, समर्थ, सुधाकर सर्वे यांच्यासह ईवानचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष योगदान दिले.

यावेळी नागपुरातील विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, तिन्ही सैन्यदलांचे माजी सैनिक, ईवान महिला मंडळाच्या

सदस्या तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण अजनी परिसर दुमदुमून गेला आणि

परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

 

Published by – SanvadMedia

Social Media