या अँटिमायक्रोबियल रंगासाठी नॅनो संमिश्रे संशोधनास भारतीय पेटंट

कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे विविध संसर्गजन्य आजार वाढत चालले आहेत. म्हणून या सूक्ष्म जीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार आणि पुनरुत्पादन रोखण्याठी प्रा. सागर डेळेकर यांनी अँटिमायक्रोबियल रंगासाठी (पेंट) आवश्यक नॅनो संमिश्रे संशोधनातून तयार केली आहेत.या अँटिमायक्रोबियल रंगासाठी नॅनो संमिश्रे (nano composites)संशोधनास भारतीय पेटंट मिळालं आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या(Shivaji University) रसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. डी. तथा सागर डेळेकर, त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रा. शामकुमार देशमुख यांना अँटिमायक्रोबियल रंगासाठी नॅनो संमिश्रे या संशोधनाकरिता भारतीय पेटंट मिळालं आहे. दैनंदिन जीवनात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी (Bacteria, viruses, fungi)आदी सूक्ष्म जीवजंतू सर्वत्र आढळतात.

पोषक वातावरणात हे सूक्ष्म जीवजंतू त्वरित पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गधी, अस्वच्छता पसरते. हे सूक्ष्म जीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करून अनेक संसर्गजन्य आजार होतात.जंतूंच्या प्रसारामुळे अनेकवेळा रुग्ण दवाखान्यात दाखल होतात. परंतु, काही वेळा तो सूक्ष्म जीवजंतूच्या संसर्गजन्य आजारामुळे दगावतो. मधुमेही, बीपी रुग्णांना अशा जंतूचा संसर्ग लवकर होऊन त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते.

कोरोना विषाणूमुळे होणारे विविध संसर्गजन्य आजार(infectious diseases) वाढत चालले आहेत. म्हणून या सूक्ष्म जीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार आणि पुनरुत्पादन रोखण्याठी अँटिमायक्रोबियल रंगासाठी (पेंट) आवश्यक नॅनो संमिश्रे संशोधनातून तयार केली असल्याचं या प्रकल्पाचे संशोधक प्रा. डॉ. सागर डेळेकर यांनी सांगितलं.
अशा रंगाचे आवरण घरातील आणि दवाखान्यातील विविध वस्तूंना दिल्यास त्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील
सूक्ष्म जीवजंतू नष्ट होऊन त्यांचा प्रसारही होत नाही. त्यामुळेच विविध संसर्गजन्य आजारांचा अटकाव होऊ शकतो.

हा रंग (पेंट) घर, ऑफिस, दवाखान्यातील विविध उपकरणं, कॉट, दरवाजे, कपाटं, टेबल, खुर्ची आदींसाठी वापरू शकतो, या रंगाचे आवरण दिल्यास ते पृष्ठभागही जंतूविरहीत होऊ शकतात. डॉ. सागर डेळेकर यांनी संशोधित केलेली नॅनो संमिश्रे ही दीर्घकालीन अँटिमायक्रोबियल गुणधर्म असलेले पदार्थ असून ते पूर्ण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत, असं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शिर्के यांनी सांगितलं.

शिवाजी विद्यापीठाच्या या नॅनो संमिश्रे संशोधन प्रकल्पासंदर्भात कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील
फॉर्च्यूनकोट इंडस्ट्रीज या पावडर कोटिंग निर्मिती करणाऱ्या उद्योगाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे संशोधन कितपत प्रभावी आणि उपयुक्त आहे, हे या संयुक्त प्रकल्पामुळे विविध तपासण्या आणि कसोट्या यांच्याद्वारे सिध्द, स्पष्ट झालं असल्याचं या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Various infectious diseases are on the rise due to corona virus. Therefore, in order to prevent the spread and reproduction of this micro-organism on the surface, Prof. Sagar Delekar has created the nano composites required for antimicrobial paint through research. Nano composites research for this antimicrobial color has received an Indian patent.

Social Media