नवी दिल्ली : देशातील कोरोना प्रकरणांमध्ये (corona cases)वाढ आणि प्रवाशांच्या अभावामुळे रेल्वेने पुढील आदेश होईपर्यंत लांब पल्ल्याच्या 28 जोड्या रद्द केल्या आहेत. यात शताब्दी, राजधानी, दुरंतो(Duronto ) आणि वंदे भारत एक्स्प्रेस(Vande Bharat Express) गाड्यांचा समावेश आहे. उत्तर रेल्वेने आज एका निवेदनात ही माहिती दिली. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये 8 जोडी शताब्दी, दोन जोडी दुरंतो, दोन जोडी राजधानी आणि एक जोडी वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.
रद्द केलेल्या गाड्यांमध्ये नवी दिल्ली-हबीबगंज शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-कालका शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-डेहराडून शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी स्पेशल आणि नवी दिल्ली-चंडीगड शताब्दी स्पेशलचा समावेश आहे. पुढील आदेश होईपर्यंत 9 मेपासून ते रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नवी दिल्ली-डेहराडून जनशताब्दी स्पेशल 10 मे आणि नवी दिल्ली-उना जनशताब्दी स्पेशल 9 ऑगस्टपासून पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात येणार आहे.
दुरंतो आणि वंदे भारत एक्स्प्रेसही रद्द (Duronto and Vande Bharat Express also cancelled )
रेल्वेने सांगितले की निजामुद्दीन-पुणे दुरंतो स्पेशल पुढील 10 मे पासून आणि सराय रोहिल्ला-जम्मू दुरंतो स्पेशल 9 मे पासून रद्द करण्यात येणार आहेत. पुढील आदेशांपर्यंत निजामुद्दीन-चेन्नई राजधानी स्पेशल १२ मे पासून आणि नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी स्पेशल ११ मेपासून रद्द करण्यात येणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत दिल्ली-कटरा वंदे भारत स्पेशल एक्सप्रेस 9 मेपासून रद्द करण्यात आली आहे. कोरोना काळातील नियमित गाड्या ऑपरेशनसाठी बंद आहेत, परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विशेष गाड्या चालवित आहे.
मध्य रेल्वेने 23 प्रवासी गाड्या रद्द केल्या (Central Railway cancels 23 passenger trains)
मध्य रेल्वेने 23 प्रवासी गाड्याही रद्द केल्या आहेत. त्यापैकी नागपूर-कोल्हापूर विशेष रेल्वे 29 जूनपर्यंत, सीएसएमटी-कोल्हापूर स्पेशल 1जुलैपर्यंत तर सीएसएमटी-पुणे स्पेशल 30 जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
Due to increase in corona cases and lack of passengers in the country, railways have cancelled 28 long distance pairs till further orders. This includes Shatabdi, Rajdhani, Duronto and Vande Bharat Express trains. Northern Railway said this in a statement today. The cancelled trains include 8 pairs of Shatabdi, two pairs of Duronto, two pairs of Rajdhani and one pair of Vande Bharat Express.
Corona Updates : अनेक देशांनी भारतीय विमानांवर घातली बंदी !