भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था २०३०पर्यंत ८०० अब्ज डॉलर होणार असून किराणा व्यवसाय १,५०० अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज : अहवाल

नवी दिल्ली : (Consulting Firm RedSeer) कन्सल्टिंग फर्म रेडसीयर कंपनीने म्हटले आहे की, भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था(Digital Economy) २०३० पर्यंत ८०० अब्ज डॉलर इतकी होईल. याशिवाय भारताची ऑनालाइन किरकोळ बाजारपेठ देखील २०२१ मध्ये ५५ अब्ज डॉलर आणि २०३० पर्यंत ३५० अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल आणि भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ असलेला देश बनेल.

घरगुती गॅसच्या नवीन किंमती 1 ऑक्टोबरला होणार निश्चित, 60 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता : ओएनजीसी – 

यासोबतच किराणा व्यवसाय देखील २०३० पर्यंत सुमारे १,५०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. २०२० मध्ये २०२० मध्ये ही ८५-९० डॉलर्सची बाजारपेठ होती. याचे प्रमुख कारण देशात ई-कॉमर्स आणि डिजिटल एज्युकेशन टेक्नॉलॉजी सारख्या ऑनलाइन सेवांची वाढती लोकप्रियता आहे. रेडसीयर च्या ‘ग्राउंड झिरो ५.०’ कार्यक्रमात ही माहिती सामायिक करण्यात आली.

रेटिंग संस्था S&P ने कमी केला विकास दराशी संबंधित अंदाज! – 

कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अनिल कुमार यांनी सांगितले की, ‘आज ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांचे म्हणणे आहे की ते सोयींसाठी ऑनलाईन सेवांचा वापर करतात. काही वर्षांपूर्वी, सुमारे ७० टक्के ग्राहकांचे म्हणणे होते की किंमतींमध्ये सूट मिळण्यामुळे ते याचा वापर करतात, परंतु कोव्हिड संसर्ग आल्यापासून डिजिटल सेवांनी निःसंशयपणे ग्राहकांची खूप सेवा केली आहे. ग्राहकांचे समाधान आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे महत्वपूर्ण माध्यम म्हणून डिजिटल सेवांचा वापर सुरू ठेवण्याच्या इच्छेद्वारे ही बाब स्पष्ट झाली आहे. ’ त्यांनी सांगितले की, नवीन उद्योजकांद्वारे नवीनता निर्माण होईल ज्यामुळे भारतीय बाजारपेठ जागतिक स्तरावर यशस्वी होईल.
India’s online consumer market will be $ 800 billion by 2030, grocery business will reach 1,500 billion: report.



अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी तर, निर्गुंतवणुकीचे उद्दीष्ट रूळावर : सीईए –

अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी तर, निर्गुंतवणुकीचे उद्दीष्ट रूळावर : सीईए

‘या’ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता! –

…लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता!

Social Media