मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली २ वर्षे सगळ्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. सगळ्या क्षेत्रातील समीकरणेच बदलली. काही लोक डिप्रेशन मध्ये गेले. रेल्वे प्रवास आपल्या सहकारी बँक कर्मचाऱ्यांना उपलब्ध नव्हता. वर्तमानाची काही शक्यता नसताना कठीण परिस्थितीमध्ये वसुधेव कुटुंबकम पद्धतीप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांने बँकिंग सेवा अविरत सुरू ठेवली होती, असे उद्दगार NKGSB बँकेंचे नवनिर्वाचित संचालक- उद्योजक अय्यर रंगनाथन यांनी वांद्रा शाखेच्या वर्धापनदिनी काढले.
५ राज्यांमध्ये असलेल्या सहकारी क्षेत्रातील शतक महोत्सव साजरा केलेल्या NKGSB बँक कर्मचाऱ्यांनी हे तंत्रज्ञानाचे युग आहे, हे ध्यानात ठेवायला हवे. १२ दिवसांनी नवं आर्थिक वर्ष सुरू होईल. अनेक गोष्टींची नव्याने मांडणी करावी लागेल. नवे काही तरी करायचे, म्हणजे अंगी उत्साह पाहिजे. सकारात्मक विचाराकडे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात आत्मनिर्भरतेने आपण ग्राहक सेवा पुरवायला पाहिजे.
त्यासाठी जबाबदारी तुमची आमची हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. या प्रसंगी संचालक अँड. किरण कामत, डॉ. अनुया वर्टी, सोनवणे फुटवेयरचे संतोष सोनवणे या तिन्ही संचालकांनी वर्धापनदिनी वांद्रा शाखेला भेट देवून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. संचालक व कर्मचारी यांच्यातील दरी झुगारून कर्मचाऱ्यांमध्ये प्रेमाचे- स्नेहाचे वातावरण निर्माण केले.
मुख्यमंत्र्यांनी फिरण्याबरोबरच जनतेची सुख-दु:खेही निवारण करावीत : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर