जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाने पाठवले समन्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez)त्रास कमी होताना दिसत नाहीये. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी(Sukesh Chandrasekhar) संबंधित मनी लाँड्रिंग(Money Laundering) प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावले आहे. पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला २६ सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने ही दखल घेतली आहे.

अहवालानुसार, ईडीने(ED) जॅकलिनला खंडणीच्या पैशाची लाभार्थी म्हणून शोधले होते. ठग सुकेश चंद्रशेखर हा खंडणीखोर असल्याचे जॅकलिनला माहीत होते, असा ईडीचा विश्वास आहे. मुख्य साक्षीदार आणि आरोपींच्या जबाबावरून असे दिसून आले की जॅकलीन फर्नांडिस व्हिडिओ कॉलद्वारे सुकेशच्या सतत संपर्कात होती.

यापूर्वी, ईडीला सुकेश चंद्रशेखरने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्याचं आढळून आलं होतं. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आतापर्यंत जॅकलिनची 7 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखर विरुद्ध अनेक राज्यांचे पोलिस आणि सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर या तीन केंद्रीय संस्थांद्वारे 32 हून अधिक गुन्हेगारी प्रकरणांचा तपास सुरू आहे.

 

Social Media